AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशी भविष्य 5 November 2024 : आज मनात अज्ञात भिती राहील… कारण काय?; तुमची का ही रास?

Horoscope Today 5 November 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 5 November 2024 : आज मनात अज्ञात भिती राहील... कारण काय?; तुमची का ही रास?
| Updated on: Nov 05, 2024 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 November 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी साधारण राहील. व्यापारात घट झाल्यामुळे तुम्ही चिंतित असाल, परंतु तुम्ही तुमचा भरपूर वेळ तुमच्या व्यवसायात द्याल आणि तुमच्या समस्यांपासून सहज बाहेर पडू शकाल. तुम्हाला आश्चर्यकारक भेट मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचीही गरज आहे. जर तुम्ही कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन शेअर मार्केटशी संबंधित पैशाचे गुंतवणूक कराल तर तुमच्यासाठी चांगले राहील.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज कोणतीही जोखिम अंगावर घेऊ नका किंबहुना जोखमीपासून दूरच राहा. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुम्ही तुमचे गृहस्थ जीवन सुखात चालवू शकाल. नोकरी शोधणार्‍यांना काही चांगल्या बातम्या ऐकू येऊ शकतात. तुमचे तुमच्या भावंडांशी वाद होतील. प्रेयसीचा रुसवा काढण्यात दिवस जाईल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस तुमचासाठी चिंता करणारा असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला काहीतरी सांगितल्याने त्याला वाईट वाटू शकते. तुम्ही आपल्या कामाच्या बाबतीत योजनाबद्ध पद्धतीने पुढे गेलास तर तुमच्यासाठी योग्यच राहील. तुम्हाला व्यवसायात नवीन उंची गाठायला मिळेल, त्यामुळे तुमची मालमत्ते संबंधित कोणतीही डील फायनल होऊ शकते. सासूरवाडीतून कोणतीही उधार घेऊ नका. नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला लोकांचा आदर मिळेल आणि कुटुंबात तुम्हाला महत्त्व मिळेल. तुम्ही पैसा कमावण्याचा नवीन मार्ग शोधाल. तुम्हाला कदाचित प्रवास करावा लागेल. तुमच्या व्यवसायात तुम्ही काही बदल कराल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. तुम्ही राजकारणात असाल तर तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करशील, पण अतिरिक्त कामामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तुम्ही आपल्या समस्यांबद्दल आपल्या वडिलांशी बोलू शकता. तुमचे मनमानी वर्तन पाहून लोक नाराज होतील. कोणतेही काम उतावीळपणाने करू नका, नाहीतर चूक होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचा बॉस तुम्हाला काही जबाबदाऱ्या देईल, पण तुम्ही त्या जबाबदाऱ्या लिलया पूर्ण कराल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज तुमच्या मनात काही अज्ञात भीती राहील आणि तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आजारामुळे तुम्ही चिंतित व्हाल. तुम्हाला व्यवसायात थोडे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या आसपासचे वातावरण मात्र आनंददायक राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्या मिळू शकतात आणि ते परीक्षा देण्यासाठी कुठे तरी जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागतील.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात आणि त्यामुळे इतरांविषयी तुमचे मत खराब होऊ शकते. यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुमच्या वागणुकीमुळे तुमचे कुटुंबीयही नाराज होऊ शकतात. तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. दिखावा करण्याच्या फंदात अडकू नये, नाहीतर तुम्हाला पुढे पैशांची तंगी भासू शकते. कुटुंबातील कोणाच्या तरी लग्नाची बातमी येऊ शकते आणि यामुळे वातावरणात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही धीर धरायला शिकावे लागेल. जर तुम्ही नवीन काही करत असाल तर तुमच्या कुटुंबीयांचा सल्ला अवश्य घ्या.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. इतरांना न विचारता सल्ला देण्याचे टाळावे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला दोघांना एकमेकांना चांगले जाणून घेण्याची संधी मिळेल आणि तुमचे घर सुखी राहील. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका नाहीतर ते तुमचा विश्वास तोडू शकतात. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री करत असाल, तर तुम्हाला त्याचे कागदपत्र स्वतः तपासावे लागतील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

लांबचा प्रवास घडू शकतो. पण व्यवसायातील उतार-चढावांमुळे तुम्ही थोडे चिंतित राहाल. तुम्ही तुमच्या कार्यस्थळात कोणताही बदल करू शकता. जर तुमच्या कुटुंबात कोणताही वाद चालू असेल, तर तुम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही कायदेशीर प्रकरणामुळे चिंतित असाल, तर तुम्हाला त्यासाठी आता तातडीने पावले उचलावी लागतील. त्यानंतरच तुमची या प्रकरणातून सुटका होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणींमुळे, ते अभ्यासात कमी रस घेतील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

तुमचे मन अनेक कामांमुळे चिंतित राहील. म्हणून, तुम्ही वाहन चालवणे टाळावे, अपघाताची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायात कोणतेही मोठे जोखीम घ्याल, तर ते तुम्हाला नंतर थोडे नुकसान पोहोचवू शकते, म्हणून तुम्ही तुमचे पैसे खूप विचार करून गुंतवावेत. जर तुम्ही तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा विचार टाळा. थोडावेळ जुन्याच नोकरीत राहा. तुमच्या टोचून बोलण्यामुळे कुटुंबातील लोक नाराज होतील.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा वेगळा असेल. तुम्हाला आज आजारपणाची काळजी वाटेल आणि लोकांबद्दल सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबात काही छोटे-मोठे वाद होऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला कोणत्याही वादात पडण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे आणि अनोळखी लोकांशी संवाद साधू नका.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

नोकरीच्या ठिकाणी कामाची छाप पाडाल. त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल करण्याचा विचार करू शकता, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करा. तुम्ही तुमच्या पालकांसोबत धार्मिक यात्रा करण्याचा विचार करू शकता आणि जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला ते मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मोठी जोखीम घेऊ नये, नाहीतर नंतर समस्या उद्भवू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.