Eclipse 2023 : ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या गोचरासोबत दोन ग्रहण, या राशींचं नशिब पालटणार
Astrology 2023 : ऑक्टोबर महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ग्रहांच्या गोचरासोबत दोन ग्रहण या महिन्यात आहेत. त्यामुळे राशीचक्रातील तीन राशींना फायदा होणार आहे.

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र ग्रहणाचं विशेष महत्त्व आहे. 14 ऑक्टोबरला सूर्य ग्रहण आमि 28 ऑक्टोबरला चंद्र ग्रहण आहे. एका महिन्यात दोन ग्रहण असल्याने राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. कन्या राशीत हे सूर्यग्रहण होणार आहे. रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी हे ग्रहण सुरु होईल आणि मध्यरात्री 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत हे ग्रहण असणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे नियम पाळण्याची गरज नाही. दुसरीकडे, 29 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण असणार आहे. मेष राशीत हे चंद्रग्रहण होणार आहे. रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल आणि 2 वाजून 22 मिनिटांनी ग्रहण संपेल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असून सूतक काल पाळावा लागेल.
सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा राशींवर या राशींना फायदा
मिथुन : या राशीच्या जातकांना ग्रहण कालावधीचा फायदा होणार आहे. या कालावधीत आत्मविश्वास वाढेल. तसेच एकाग्रता वाढेल. सकारात्मक परिणामामुळे करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. तसेच प्रत्येक क्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल. थोडाशा मेहनतीने तुम्हाला चांगला फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ होऊ शकतो.
सिंह : या राशीच्या जाकांनाही ग्रहण कालावधीत फायदा दर्शवत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल. प्रेम प्रकरण आणि वैवाहित जीवनात आनंद मिळेल. करिअरमध्ये काही सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. डोक्यावर असलेल्या कर्जाचा भार हलका होईल. मित्र परिवारांकडून मदत होईल.
तूळ : या राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिना आनंदात जाईल अशी स्थिती आहे. समाजात मानसन्मान मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची दारं खुली होतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात तुम्हाला मोठी डिल मिळू शकते. पण या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमचं वागणं एखाद्याच्या भावना दुखावू शकते. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
