राजा रघुवंशीसाठी काळ बनला मंगल दोष! तुमच्या कुंडलीत तर नाही हे सावट? जाणून घ्या
इंदूरचे राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. ते हनिमूनसाठी शिलाँगला गेले, जिथे राजाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि सोनमचा आता कुठे पत्ता लागला आहे. लोक बोलू लागले आहेत की, कुंडलीतील दोषामुळे देखील अशा गोष्टी घडतात.

हिंदू धर्मातील शास्त्रांमध्ये कुंडलीला विशेष महत्त्व दिले जाते. लग्नापूर्वी जन्म पत्रिका जुळवणं ही केवळ परंपरा नसून, जीवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. सनातन संस्कृतीत असा विश्वास आहे की, जर वर-वधूच्या कुंडली जुळल्या नाहीत, तर लग्नानंतर त्यांचं वैवाहिक जीवन समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. नुकत्याच इंदूरमधील एका नवविवाहित जोडप्याच्या घटनेने या धारणेला आणखी बळकटी दिली आहे.
इंदूरचे राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. ते हनिमूनसाठी शिलाँगला गेले, जिथे राजाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि सोनमचा आता कुठे पत्ता लागला आहे. लोक बोलू लागले आहेत की, कुंडलीतील दोषामुळे देखील अशा गोष्टी घडतात. त्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊया. या अहवालात मंगल दोषाचे दुष्परिणाम.
मंगल दोषामुळे होतात अनेक धोके
उज्जैनचे प्रख्यात ज्योतिष आचार्य रवी शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, जर एखाद्याच्या कुंडलीत मंगल ग्रह पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल, तर त्याला मंगल दोष म्हणतात. याचा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होतो. मंगल दोषामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात, जसे की- कौटुंबिक कलह, आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित त्रास, अकाली मृत्यू यांसारखी भीती कायम राहते.
कोणत्या उपायांनी मंगल दोष शांत होतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, दोषांची शांती होऊ शकते. पण ते पूर्णपणे नष्ट करणं कदाचित शक्य नसतं. ज्याप्रमाणे एखाद्या आजारी व्यक्तीला औषध दिलं तर याची खात्री देता येत नाही की समस्या पूर्णपणे संपली आहे. काही काळानंतर समस्या परत येऊ शकते. त्याचप्रमाणे दोषांचे उपाय केल्याने शांती मिळते, पण समस्या पूर्णपणे संपत नाही. मंगल दोष दूर करण्यासाठी उज्जैनमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे.
मंगलनाथ अंगारेश्वराचं विशेष महत्त्व
धार्मिक नगरी उज्जैनमधील मंगलनाथ मंदिरात भात पूजेचं विशेष महत्त्व आहे. हे स्थान मंगल ग्रहाचे जन्मस्थळ मानलं जातं. मंगल दोष निवारण आणि शुभ फल प्राप्तीसाठी दररोज शेकडो लोक येथे येतात आणि भात पूजा करतात. भात पूजेमध्ये तांदळाने भगवान मंगलाची पूजा केली जाते, ज्यामुळे कुंडलीतील मंगल ग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना शांत करता येऊ शकतं.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)