
आता काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची भक्ती भावानं पूजा केल्यास तुमच्यावर सदैव माहादेव आणि पार्वती मातेची कृपा राहाते. तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं, अशी मान्यता आहे. येणारा श्रावण हा ग्रह नक्षत्राच्या दृष्टीने देखील खास असणार आहे. अनेक मोठे ग्रह या काळात राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम हा बाराही राशींवर होतं असतो. काही राशींना त्याचं अशुभ फळ मिळतं तर काही राशींना या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं शुभ फळ मिळतं. श्रावण महिन्यामध्ये तीन राशींवर महादेवांची विशेष कृपा राहणार आहे, या राशींचं भाग्य उजळणार आहे. कोणत्या आहेत या तीन राशी जाणून घेऊयात.
वृषभ रास – वृषभ राशींच्या लोकांसाठी श्रावणाचा हा महिना खूप खास असणार आहे. या काळात धार्मिक कामातील तुमची रूची वाढणार आहे. घरात शुभ कार्य घडण्याचा योग आहे. तुमचा जीवनसाथी एखाद्या धार्मिक यात्रेसाठी जाऊ शकतो. या काळात तुम्हाला अचानक धन लाभाचा योग आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होणार आहे, जर तुम्ही घरासाठी काही गुंतवणूक केली असेल तर या काळात तुम्हाला त्याचा दुप्पट फायदा मिळू शकतो.
कन्या रास – कन्या राशींच्या लोकांसाठी देखील श्रावण महिना हा खूप खास असणार आहे. या राशींच्या लोकांवर महादेवांची कृपा राहणार आहे. या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. व्यावसयातून देखील चांगला नफा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशनचा योग आहे. तुमचं वैवाहिक जीवन देखील या काळात चांगलं असणार आहे.
कुंभ रास – कुंभ राशींच्या लोकांवर महादेवांची कृपा होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल. या राशीच्या विद्यार्थ्यांना देखील श्रावण महिना विशेष असणार आहे, काही आनंद वार्ता या काळात कानी येतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, किंवा बेरोजगार आहेत, अशा लोकांना लवकरच चांगली संधी मिळण्याचे योग आहेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)