AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kanya Rashifal 2023: कन्या राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, वर्षभरात कोणकोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार?

कन्या राशीसाठी 2023 वर्ष कसे जाणार जाणून घेऊया

Kanya Rashifal 2023: कन्या राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, वर्षभरात कोणकोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार?
कन्या राशी वार्षिक राशीभविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 01, 2023 | 2:21 PM
Share

मुंबई, नवीन वर्ष 2023 कन्या राशीच्या (Virgo Year horoscope 2023)  लोकांसाठी यश मिळवून देणारे आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी विशेषत: व्यवसायात हे वर्ष भरपूर लाभदायक ठरेल. पैसा, नातेसंबंध, करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्यासाठी ते कसे असेल, काेणत्या बाबतीत तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल? कन्या राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल ते जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

 ऑक्टोबरपर्यंत बहुतांश काळ अनुकूल राहील. कठोर परिश्रम आणि समर्पणाने, आपण सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कराल. सर्वांना सोबत घेऊन चालाल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून फायदा होईल. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन लोकांशी सावधगिरी बाळगाल. करिअर व्यवसायात तथ्य तर्कावर अवलंबून राहाल. नोकरी व्यवसाय आणि सेवा क्षेत्राशी संबंधित लोकं अधिक प्रभावशाली असतील. यशाची पातळी काठावर असेल.

जानेवारी ते मार्च महिन्यात बदल होतील

जानेवारी ते मार्च या काळात बदलामुळे कामाचा वेग वाढेल.   आरोग्याशी संबंधित खबरदारी घ्या. राशीचा स्वामी शनिदेवाचा  कुंभ राशीत प्रवेश फयद्याचा ठरेल. प्रसंगांना धैर्याने सामोरे जाल. कामात अपेक्षित परिणाम मिळेल. मुलाखतीत यश मिळेल. वडीलधाऱ्यांचा आदेश व शिस्त पाळा. वडिलोपार्जित बाबी अनुकूल होतील.

आरोग्य आणि कुटुंब

हे वर्ष त्याग, तपश्चर्या आणि प्रियजनांसाठी कार्य करण्यावर भर देणारे आहे, नातेवाईकांसाठी हे वर्ष लाभदायक राहील.  सुरुवातीला मेहनत जास्त असेल.  प्रियजनांसाठी वेळ काढावा लागेल. आपल्या प्रियजनांच्या सुखासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. एप्रिलनंतर केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. घरात आनंद आणि सौहार्द वाढेल. आरोग्याशी तडजोड करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती