AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीवर भद्राचं सावट! जाणून घ्या या दिवशी नेमकं काय करायचं?

महाशिवरात्री हा शिव भक्तांसाठी मोठा उत्सव असतो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात. मात्र यंदाच्या महाशिवरात्रीवर भद्राचं सावट आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय करायचं ते

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीवर भद्राचं सावट! जाणून घ्या या दिवशी नेमकं काय करायचं?
महाशिवरात्रीच्या निशीत काळात भद्राची छाया, मग पूजा विधी करायचं की नाही? जाणून घ्या
| Updated on: Feb 15, 2023 | 6:51 PM
Share

मुंबई : भगवान भोलेनाथांची कृपा मिळवण्यासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस आहे. शिवलिंगावर धोतरा, बेलपत्र आणि भांग अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.महाशिवरात्री यंदा 18 फेब्रुवारी, शनिवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनि प्रकोपातून दिलासा मिळावा यासाठी उपाय सांगण्यात आले आहे.असं असताना दुसरीकडे भद्राचं सावट असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भ्रदा काळ आणि निशित काळ एकत्र आल्याने भक्तांमध्ये चिंता वाढली आहे. नेमकं पूजा करायची की नाही असा प्रश्न पडला आहे. पंचांनुसार महाशिवरात्रीला रात्री 8 वाजून 1 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 6 वाजून 57 मिनिटांपर्यंत भद्राचं सावट असणार आहे. भगवान शिवाची पूजा निशित काळात करण्याची प्रथा आहे.त्यामुळे शिवाचे भक्त संकटात सापडले आहेत. कारण भद्रा काळात शुभ कार्य करत नाही.असं असलं तरी भद्राचा कोणताही प्रभाव महाशिवरात्रीवर पडणार नाही, त्यामुळे निश्चिंतपणे पूजा विधी करू शकता.

भद्राचा प्रभाव मंगळ कार्य आणि शुभ कार्यांवर असते. म्हणजेच लग्न, मुंडन आणि गृहप्रवेशासाठी भद्रा काळ पाहिला जातो. मात्र देवांची पूजा करताना यात कोणतीही अडचण येत नाही. विशेष म्हणजे महाशिवरात्रीला भद्रा पाताळात असणार आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीशी काही संबंध नाही. त्यामुळे भद्रा काळातही तुम्ही शिवाची पूजा करु शकता.

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त

  • निशित काळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत
  • पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटं ते रात्री 09 वाजून 46 मिनिटांपर्यंत
  • द्वितीय प्रहर – रात्री 09 वाजून 46 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत
  • तृतीय प्रहर – 19 फेब्रुवारी, रात्री 12 वाजून 52 मिनिटांपासून 03 वाजून 59 मिनिटांपर्यंत
  • चौथा प्रहर -19 फेब्रुवारी, 03 वाजून 59 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत
  • पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 02 वाजून 40 मिनिटांपर्यंत

महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती

महाशिवरात्रीला शनिदेव आपली स्व-रास असलेल्या कुंभ राशीत विराजमान असणार आहेत. दुसरीकडे सूर्यदेव गोचर करुन कुंभ राशीत आल्याने शनि-सूर्य युति तयार झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही युती अशुभ मानली जाते. दुसरीकडे शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं गोचर काही राशींसाठी शुभ ठरू शकते. पण शनि प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी उपाय करू शकता. शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, देशी तूप, मध आणि भांग अर्पण करा. यामुळे शनि पीडिचा प्रभाव कमी होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!