AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशी भविष्य 12 June 2024 : प्रेयसी नकार देईल… कुणाच्या राशीत काय दडलंय?; आजचं राशी भविष्य काय?

Horoscope Today 12 June 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य 12 June 2024 : प्रेयसी नकार देईल... कुणाच्या राशीत काय दडलंय?; आजचं राशी भविष्य काय?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2024 | 7:00 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 June 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries Daily Horoscope)

कला आणि कौशल्याच्या क्षेत्रात तुम्हाला आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या सुख आणि संपत्ती वाढ होईल. बराच काळ अडकून राहिलेली डील आज पूर्ण होईल. तुमच्या मनमानी व्यवहारामुळे काही अडचणी येतील. एखाद्या गोष्टीवर जास्त बोलू नका. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. कुटुंबात ज्याच्यावर एखादी जबाबदारी द्याल तो तुमचं काम पूर्ण करेल. राजकारणातील लोकांना दिवस चांगला आहे. एकादं मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरणार आहे. तुमच्या व्यवसायात कमाई करण्यावर भर द्यावा लागेल. कुणालाही पैसे उधार देऊ नका. आईकडून आज तुम्हाला मोठी भेट मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली वार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत चांगलं राहील. विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना आज अर्ज करण्यासाठीचा चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांना घेऊन पिकनिकला जाण्याचा बेत कराल. आरोग्याच्या बाबतीत तक्रारी उद्भवतील. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीने चांगलं स्थान मिळवाल. व्यवसायात तुम्हाला जुन्या योजनांमुळे लाभ मिळेल. तुमच्या यशाचे नवनवीन मार्ग उघडे होतील. पण तुम्ही एका कामामुळे त्रस्त असाल. त्यासाठी तुम्हाला प्रवासही करावा लागणार आहे. अनेक वर्षानंतर एका जुन्या मित्राची भेट होईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर फोकस केला पाहिजे. तरच त्यांना परीक्षेत यश मिळेल.

कर्क (Cancer Daily Horoscope)

नोकरीत कार्यरत असणाऱ्यांना आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. शेअर मार्केटशी संबंधितांना आज मोठं काम मिळेल. तुम्हाला एखादा नवा प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढणार असून हा आनंद तुमच्यासाठी खास असेल. नोकरीत कार्यरत असणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. नाही तर त्या कामात गडबड होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करत असाल तर सढळ हाताने गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही खास योजना आखण्याची चिन्हे आहेत. आळशी स्वभावामुळे कामं रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. एखाद्याला वचन देण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल. भावूक होऊन निर्णय घेऊ नका. तुमच्या मित्रांसोबत काही वेळ गप्पागोष्टी करण्यात घालवाल. तुमच्या घरी आज एखाद्या पाहुण्याचं आगमन होईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एखाद्या समस्येचा सामना करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे मदत मागितली तर ती सहज मिळेल. खाण्यापिण्याची पथ्य पाळा.

कन्या (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस तुम्ही समस्यांशी झुंजणार आहात. तुमचा एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. कारण तुम्ही काही कामांमध्ये तुमची मनमानी चालवाल. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबात तुम्हाला ताळमेळ साधावा लागणार आहे. तुमच्या वैयक्तिक प्रकरणात बाहेरच्या लोकांचा सल्ला घेऊ नका. एखादं कोर्टकचेरीचं प्रकरण असेल तर ते मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. जीवनसाथीला घेऊ शॉपिंगला जाल.

तुळ (Libra Daily Horoscope)

करिअरमुळे सतत टेन्शनमध्ये असणाऱ्यांना आजच्या दिवशी आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायातील छोटीमोठी संधी सोडू नका. वेळेचा सदुपयोग करा. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्ही खूपच प्रवास करता. ते टाळा. कोणत्याही विचित्र टास्कमध्ये भाग घेऊ नका. कुटुंब आणि जीवनसाथीसाठी वेळ काढा. एखाद्या धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

खर्च वाढण्यापासून सावध राहण्याचा आजचा दिवस आहे. आज जर तुम्ही खर्चावर नियंत्रण नाही ठेवलं तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला त्याचा लाभ होईल. निर्णय घेताना विचार करा. कुटुंबात मोठ्या व्यक्तींमध्ये एखाद्या विषयावर वाद असेल तर तो सोडवून घरात शांतता निर्माण करा. तुमच्या आजूबाजूच्या शत्रूंकडेही लक्ष द्या. एखाद्या समस्येमुळे तुम्ही तुमच्या मुलांना नाराज करू शकता. आईने दिलेली जबाबदारी पूर्ण करा.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करू नका. तुम्ही नव्या नोकरीत व्यस्त राहाल. पण तुम्हाला जुन्या नोकरीतही लक्ष घालावं लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चाच्याबाबत सावध राहावं लागेल. बऱ्याच काळापासून अंगदुखी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वाद बाहेरच्या लोकांसमोर आणू नका. नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुमच्याकडून चुका होऊ शकतात. आज तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकाल.

मकर (Capricorn Daily Horoscope)

आज तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. गेल्या अनेक वर्षापासूनची अर्धवट इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मौज, मस्ती कराल. कुटुंबातील समस्या सोडवाल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात संधीच संधी मिळेल. नवा प्रकल्प सुरू कराल. हात लावाल तिथे सोनं असा तुमचा आजचा दिवस असणार आहे.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आज धंदापाणी चांगला राहील. पण कुणाचा सल्ला घेण्यापूर्वी सावध राहा. सल्ला घेतला असला तरी दहावेळा विचार करून त्याचा अंमल करा. मुलांच्या यशात येणारे अडथळे दूर होतील. कोणत्याही विपरीत परिस्थितीत संयम ठेवा. उत्पन्नाच्या स्त्रोतांवर लक्ष ठेवा. प्रेयसीकडून नकार येऊ शकतो. त्यामुळे वैतागू नका. शांत राहा आणि परिस्थिती स्वीकारा. आज चिडचिड कराल. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागेल. आरोग्याची तक्रार उद्भवेल. एखाद्या किरकोळ गोष्टीवरून मित्र रागावेल.

मीन (Pisces Daily Horoscope)

यश काय असतं आणि कसं मिळतं? हे तुम्हाला आज जाणवेल. तुम्ही आज यशाची प्रत्येक पायरी चढाल. तुमच्या आयुष्यात काही आव्हानं येतील, त्यावर तुम्ही यशस्वीपणे नियंत्रण ठेवाल. पिकनिक जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातूनही भरघोस मदत आणि पाठिंबा मिळेल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. लेटनाईट पार्ट्या टाळा. पुस्तकं विकत घेण्यावर कल असेल. एखाद्या विषयावर तास न् तास वाद घालाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!