AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आजच सर्व… राज्यात मोठ्या घडामोडींना वेग

एकनाथ शिंदेंच्या सूचक इशारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेग आला आहे. उद्धव ठाकरे गट सक्रिय झाला असून, आज आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. खासदार फुटीनंतर आमदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आहे, तसेच पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरणार आहे. याशिवाय, उद्या महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी नियोजित आहे, ज्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आजच सर्व... राज्यात मोठ्या घडामोडींना वेग
एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 22, 2026 | 10:25 AM
Share

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर ऑपरेशन टायगर संपलं अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल, असं सूचक विधान केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंच्या टार्गेटवर आता आमदार आहेत की नगरसेवक? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झालेली असतानाच उद्धव ठाकरे मात्र अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या खासदारांनी बंड केलं, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मतदारांची माफी मागायला सुरुवात केली आहे. तसेच आज तर त्यांनी थेट आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या फुटीनंतर आज आमदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 2.30 वाजता शिवालय येथे ही बैठक होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत सहा खासदार फुटल्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच आमदारांनी एकजूट राहावं म्हणून खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच आमदार फुटणार तर नाही ना? याचा कानोसाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात? काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रणनीती ठरणार

याशिवाय आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाची रणनीतीही आजच्या बैठकीत ठरणार आहे. कर्जमाफी, पाऊस, नीट परीक्षा आणि विषबाधा आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच आमदारांचे प्रश्नही या निमित्ताने समजून घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्या डिनर डिप्लोमसी

दरम्यान, उद्या महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी होणार आहे. महाविकास आघाडीने उद्या संध्याकाळी एमसीएमध्ये बैठकीचं आयोजन केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. खासदारांची फूट, विधान परिषद निवडणूक निकाल आणि विधानसभेचं पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ही डिनर डिप्लोमसी होत आहे. त्यामुळे या डिनर डिप्लोमसीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन