AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palmistry : ज्याच्या हातावर असते अशी रेषा त्याच्या नशिबात असते करोडपती होण्याचा योग

तुम्हाला तळहातावर दिसणार्‍या रेषा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल बरेच काही सांगतात. या हाताच्या तळव्यामध्ये धन रेषादेखील असते. या रेषांवरून तुम्हाला कळू शकते की तुमच्याकडे पैसा येणार आहे की नाही.

Palmistry : ज्याच्या हातावर असते अशी रेषा त्याच्या नशिबात असते करोडपती होण्याचा योग
Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 09, 2023 | 6:21 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात हस्तरेषाशास्त्र (Palmistry) देखील खूप महत्वाचे मानले जाते. तुम्हाला तळहातावर दिसणार्‍या रेषा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल बरेच काही सांगतात. तळहातावर बनवलेल्या या रेषा अगदी सहजपणे सांगतात की तुमचे आयुष्य कसे असेल, तुम्हाला आयुष्यात किती पैसा मिळू शकतो किंवा नाही किंवा त्या व्यक्तीचे नशीब कोणत्या वयात चमकू शकते. या हाताच्या तळव्यामध्ये धन रेषा देखील असते. जे तुमच्याकडे पैसे कधी असतील किंवा तुम्ही श्रीमंत कधी व्हाल हे सांगते.

नेमकी कुठे असते ही रेषा?

आपल्या तळहाताकडे काळजीपूर्वक पहा. करंगळीच्या खाली पहा. तुम्हाला येथे दिसणारा फुगवटा म्हणजे बुध पर्वत. या डोंगरावरून खाली जाणारी रेषा म्हणजे पैशाची रेषा. या रेषेच्या लांबी आणि रंगासोबतच तिची खोली तुमच्याकडे किती पैसा असेल हे सांगते.

ज्यांच्या हातावर ही रेषा स्पष्टपणे दिसते ते भाग्यवान मानले जातात. रेषा जितकी सरळ असेल तितकी तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे.

जर ही रेषा तुमच्या हातावर दिसत असेल आणि स्पष्ट असूनही ती तुटलेली असेल तर तुमच्याकडे पैसा नक्कीच येईल. पण ते टिकवणे कठीण आहे. अशी रेषा असणाऱ्यांकचे वडिलोपार्जीत संपत्तीही फार टिकत नाही.

काही लोकं खूप मेहनत करतात पण त्या तुलनेत कमी पैसे मिळते. अशा लोकांची पैशाची रेषा मधून तुटलेली असते.

कुणाच्या हातात पैशाची रेषा बोथट असते, पण नशिबाची रेषा जाड असली तरी भरपूर पैसा मिळतो.

जर तुमच्या तळहातामध्ये M आकार तयार होत असेल तर तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता जास्त असते. जीवन, बुध्दी आणि नशीब रेषा मिळून ही अक्षरे तयार करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?