AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 14th May 2026 : ग्रहांची उलथापालथ: कोणाला लाभ तर कोणाला नुकसान? कोणत्या राशीवर आहे संकटाचं सावट?

Horoscope Today 14th May 2026, Thursday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 14th May 2026 : ग्रहांची उलथापालथ: कोणाला लाभ तर कोणाला नुकसान? कोणत्या राशीवर आहे संकटाचं सावट?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 6:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14th May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

या काळात तुम्ही काही धोकादायक किंवा तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहात. कोणतेही काम करताना विशेष सावधगिरी बाळगा. आरोग्याची स्थिती कमजोर राहू शकते, त्यामुळे थकवा, मानसिक ताण किंवा शारीरिक त्रास जाणवू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या दृष्टीनेही हा फार अनुकूल काळ नाही. आर्थिक व्यवहार जपून करा. उपाय म्हणून दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि काळ्या वस्तूंचे दान करा.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज दिवसभरात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना किंवा काम करताना दुखापत होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची किंवा नात्यातील तणावाची चिंता वाढू शकते. व्यवसायात थोडे नुकसान किंवा अपेक्षित लाभ न मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता कमी राहील. गावाकडे जाण्याचा योग आहे. गरीबांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नकारात्मक बाजू सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे राग, वाद किंवा चुकीचे निर्णय टाळा. प्रेमसंबंधांमध्येही समाधान कमी राहील. व्यवसाय मात्र सामान्यपणे चालू राहील. नोकरीच्या ठिकाणी थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याही परिस्थितीवर मात कराल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये तणाव जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरणात अस्वस्थता किंवा मानसिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादापासून दूर राहणे योग्य ठरेल. आज बऱ्याच महिन्यापासून रखडेललं काम मार्गी लागेल. प्रवासाचा योग आहे. पण खर्चही वाढणार आहे. कुणाच्याही ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

घरात नकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. छातीत दुखणे, श्वसनासंबंधी त्रास किंवा ताण जाणवू शकतो. प्रेमसंबंध आणि संततीसंबंधित बाबींमध्ये समाधान कमी राहील. व्यवसाय मात्र सामान्य राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण थोडं नरमगरमच राहिल. भर उन्हात बाहेर पडल्याने त्रास होऊ शकतो. नोकरदारांना खूश खबर येईल. परदेशात जाण्याचा योग आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आरोग्य काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते. विशेषतः नाक, कान आणि घशाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सामान्य राहतील आणि व्यवसायात परिस्थिती स्थिर राहू शकते. आज कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. बायको माहेरी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर खाली खाली वाटेल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज आ बैल मुझे मार अशी परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात पडू नका. नाही तर प्रकरण तुमच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे खर्च आणि गुंतवणूक जपून करा. आरोग्याचीही काळजी घ्या. प्रेम आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आरोग्य कमजोर राहू शकते आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. प्रेमसंबंधांमध्ये तणाव किंवा नाराजी राहू शकते. व्यवसाय मात्र साधारणपणे ठीक राहील. लग्न जुळून येण्याचा योग आहे. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरदारांच्या बदलीची प्रतिक्षा पूर्ण होणार आहे. संध्याकाळी मित्रांसोबत मैफल रंगेल. पण प्रवासावर अनाठायी खर्च करू नका. अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

मनात चिंता आणि अस्थिरता वाढू शकते. डोळे किंवा डोक्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि आरोग्याची स्थिती मध्यम राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. बऱ्याच दिवसापासून रुसलेली मैत्रीण आज बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन हलकं होईल. गावावरून परत येताना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. कोणतंही काम मनापासून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास यश येईल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आर्थिक अडचणी हळूहळू सुटतील. मात्र प्रेमसंबंध आणि व्यवसायात अपेक्षेइतके यश मिळणार नाही. संयम आणि शांतता ठेवणे आवश्यक आहे. वकिली, पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बँकिंग क्षेत्रात असलेल्यांना अचानक लाभ होईल. दूरचा प्रवास संभवतो. घरात युद्धसारखी परिस्थिती होईल. बायकोशी खटके उडतील. वडिलधारे रागावण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

नोकरीच्या ठिकाणी बॉसची नाराजी ओढवून घेऊ नका. परफॉर्मन्स नसल्याने त्रास होऊ शकतो. सरकारी कामांमध्ये किंवा अधिकार असलेल्या व्यक्तींकडून मदत मिळू शकते, पण अपेक्षित परिणाम थोडे कमी राहतील. छातीत किंवा श्वसनासंबंधी त्रास जाणवू शकतो. व्यवसायात अडथळे येऊ शकतात. प्रेमसंबंधही पूर्णपणे समाधानकारक राहणार नाहीत.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

नोकरीच्या ठिकाणी काम चुकारपणा टाळण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुमची चोरी पकडली जाईल. भाग्याची साथ मिळेल, पण यशासाठी संघर्ष करावा लागेल. आरोग्य मध्यम राहील. प्रेमसंबंधांमध्ये किरकोळ वाद किंवा मतभेद होऊ शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती सामान्य राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप;
FDA | अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप; थेट...
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
पावसाळी अधिवेशनात परिसीमन, महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार- सूत्र
Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? - सूत्र
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच मोठा गोंधळ; आता...
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच मोठा गोंधळ; आता अभिजीत दीपके...
सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन...; शरद पवारांचा केंद्राला इशारा
Sharad Pawar | सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन थांबणार नाही; शरद पवारांचा केंद्राला इशारा
तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड...
तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड, अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर टीका
20 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गोंधळ
Delhi | 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; मात्र जंतरमंतरवर मोठा गोंधळ
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं.

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं