
Shukra Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा एका ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. ज्योतिष शास्त्रात दैत्य गुरु शुक्राचं विशेष महत्त्व आहे. शुक्राला सुख, समृद्धी, मान, सम्मान, प्रेम आणि धन वैभावाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे जेव्हा शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो किंवा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याचा प्रभाव हा सगळ्या बारा राशींवर पडतो.आता लवकरच शुक्र देव हे उलटी चाल चालणार आहेत.त्यामुळे या काळात काही राशींना सावधान राहावे लागेल, विशेष खबरदारी घ्यावी लागले तर काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे.शुक्र वक्री झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीत मोठा फायदा होऊ शकतो.
शुक्र कधी वक्री होणार?
ज्योतिष शास्त्रानुसार दैत्य गुरु शुक्र देव यावेळी मीन राशीमध्ये सरळ मार्गी आहेत. मात्र रविवारी दोन मार्च 2025 ला सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी ते मीन राशीमध्ये वक्री होणार आहेत.या काळात काही राशींना याचा मोठा फायदा होणार असून, धन संपत्तीमध्ये वाढीचा योग आहे. सोबतच नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण यामध्ये देखील फायदा होणार आहे. जाणून घेऊयात नेमक्या त्या राशी कोणत्या आहेत?
कर्क रास – शुक्र ग्रहाची उल्टी चाल ही कर्क राशींच्या लोकांसाठी भाग्याची ठरणार आहे. या काळात कर्क राशींच्या लोकांचा पूजा आणि इतर धार्मिक कार्याकडे ओढा राहणार आहे. यात्रेदरम्यान मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात प्रमोशनचा योग आहे. ज्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते, आर्थिक स्थितीमध्ये देखील सुधारणा होण्याची शक्यता आहे.
मीन रास – शुक्र ग्रह मीन राशींच्या लोकांना देखील भरभरून देणार आहे. मीन राशींच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सोबतच काही सकारात्मक बदल देखील दिसून येतील.घरातील वातावरण आनंदी राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)