Solar Eclipse 2023 : नवरात्रीच्या आधी चमकणार या राशीच्या लोकांचे भाग्य, सूर्यग्रहणाचा होणार लाभ
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण याआधी 1845 साली लागले आहे. अमावस्या तिथीला पितरांना नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व असून या दिवशी जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा पितरांना नैवेद्य अर्पण केल्यास शुभ फळ प्राप्त होते.

मुंबई : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या ग्रहणादरम्यान अनेक अनोखे योगायोगही घडणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण पितृ पक्षाच्या शेवटी 14 ऑक्टोबर रोजी होईल. याशिवाय ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वर्षांनी असा योगायोग घडत आहे. 14 ऑक्टोबरला जेव्हा सूर्यग्रहण होईल, त्याच दिवशी सर्वपित्री अमावस्याही असेल. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला होणारे ग्रहण विशेष मानले जाते. याशिवाय ग्रहणकाळात सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असतील. अशाप्रकारे ग्रहणकाळात सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण याआधी 1845 साली लागले आहे. अमावस्या तिथीला पितरांना नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व असून या दिवशी जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा पितरांना नैवेद्य अर्पण केल्यास शुभ फळ प्राप्त होते. या योगात येणारे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी विशेष असेल ते जाणून घेऊया.
या राशीच्या लोकांना मिळणार विषेश लाभ
मिथुन
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि एक विशेष योगायोग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांवर या सूर्यग्रहणाचा विशेष अनुकूल प्रभाव पडेल. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील. तुम्हाला जीवनात अनेक शुभ आणि चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. नोकरदारांना नोकरीत अनेक चांगल्या संधी मिळतील.
तूळ
या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप फायदेशीर ठरू शकते. समाजात तुम्हाला नशीब आणि सन्मान मिळेल. जे लोकं व्यवसाय करतात त्यांना मोठा आणि चांगला नफा मिळू शकतो. तुमचे उत्पन्न अनेक ठिकाणांहून वाढू शकते. ज्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत होता ते सूर्यग्रहणानंतर संपत असल्याचे दिसत आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. संपत्तीत अचानक वाढ होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन आयाम उघडू शकतात. योजना यशस्वी होताना दिसेल. रिअल इस्टेटच्या विक्रीतूनही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
