AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: सोमवारपासुन सुरू होत आहे पंचक, राशीनुसार केलेल्या दानाने मिळेल शुभ फळ

फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर गरीब आणि गरजूंना दान करणे विशेषतः फलदायी आहे. शुभ फळ मिळण्यासाठी तुमच्या राशीनुसार कोणते दान आणि विशेष उपाय करावेत हे जाणून घेऊया.

Astrology: सोमवारपासुन सुरू होत आहे पंचक, राशीनुसार केलेल्या दानाने मिळेल शुभ फळ
सोमवती अमावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 19, 2023 | 11:36 PM
Share

मुंबई : फाल्गुन महिन्यातील अमावस्या सोमवती अमावस्या (Somvati Amavashya Today) म्हणूनही ओळखली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या 20 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णू आणि शिवाची पूजा करणे फायदेशीर ठरते. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करणे उत्तम मानले जाते. लोकं या तिथीला आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी व्रत करतात. फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर गरीब आणि गरजूंना दान करणे विशेषतः फलदायी आहे. शुभ फळ मिळण्यासाठी तुमच्या राशीनुसार कोणते दान आणि विशेष उपाय करावेत हे जाणून घेऊया.

राशीनुसार करा या गोष्टींचे दान

  1. मेष : सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर कुमकुम टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. चंद्राला प्रसन्न करण्यासाठी दूध किंवा तूप दान करा.
  2. वृषभ : एक चमचा दूध पाण्यात मिसळून चंद्र देवाला अर्पण करा. तसेच गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा.
  3. मिथुन : गाईला चारा दान करा. तसेच, चंद्राच्या बीज मंत्राचा जप करा “ओम श्रम श्रम श्रम सह चंद्रमसे नमः”.
  4. कर्क : चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि मंदिरात शंख आणि दूध दान करा.
  5. सिंह : या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. वृद्धाश्रम किंवा मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये तुमच्या क्षमतेनुसार दान करा.
  6. कन्या : या दिवशी शिवलिंगावर पांढरे फूल आणि जल अर्पण करा. मंदिरात चांदीचे कोणतेही दागिने अर्पण करा.
  7. तूळ : देवी लक्ष्मीला मोती अर्पण करणे लाभदायक ठरेल. या दिवशी मंदिरात दही किंवा तांदूळ दान करा.
  8. वृश्चिक : चंद्राचा प्रभाव कमी करण्यासाठी रुद्राष्टकांचे पठण करा. दुधापासून बनवलेली मिठाई गरिबांना दान करा.
  9. धनु : गरिबांना तांदूळ, तूप आणि दूध इत्यादी दान करा आणि वृद्धांची सेवा करा.
  10. मकर : गरीब मुलींना कपडे आणि अन्न दान करा. भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
  11. कुंभ : मंदिरात पांढऱ्या रंगाचे कपडे, मिठाई, दागिने इत्यादी दान करा.
  12. मीन : गरिबांना जास्तीत जास्त संख्येने अन्नदान करा. भगवान शंकर आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?