AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यदेव वृषभ राशीत गोचर करताच 4 राशींवर करतील कृपा; संक्रातीतील स्नान दानाचं महत्त्व समजून घ्या

सूर्यदेव एका राशीत जवळपास महिनाभर ठाण मांडून असतात. त्यानंतर दुसऱ्या राशीत गोचर करतात. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यास वर्ष लागतं. चला जाणून घेऊयात वृषभ संक्रांतीबाबत...

सूर्यदेव वृषभ राशीत गोचर करताच  4 राशींवर करतील कृपा; संक्रातीतील स्नान दानाचं महत्त्व समजून घ्या
एका वर्षानंतर सूर्यदेव वृषभ राशीत प्रवेश करताच 4 राशींना देतील साथ, गोचर संक्रांतीतील स्नान दानाचं महत्त्व आणि मुहूर्त जाणून
| Updated on: Apr 29, 2023 | 9:28 AM
Share

मुंबई : ग्रहमंडळात सूर्यदेवांना राजाचा दर्जा देण्यात आला आहे. एका राशीत सूर्यदेव महिनाभर राहतात. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना राशीचक्रातील एका पुन्हा येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागतो. सध्या सूर्यदेव मेष राशीत असून राहुसोबतच्या युतीमुळे ग्रहण योग सुरू आहे. आता 15 मे 2023 रोजी सूर्यदेव मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करतील. या गोचराला वृषभ संक्रांती म्हंटलं जातं. या दिवशी ग्रहण योग देखील सुटणार आहे.

सूर्य गोचर 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी होईल. 15 मे ते 14 जूनपर्यंत सूर्यदेव वृषभ राशीत राहतील. त्यानंतर 15 जून 2023 रोजी संध्यााकळी 6 वाजून 29 मिनिटांनी मिथुन राशीत गोचर करतील. त्यामुळे काही राशींवर शुभ आणि काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल.

या राशींना मिळेल लाभ

कर्क : या राशीच्या एकादश भावात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे या जातकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल.

सिंह : या राशीच्या दशम भावात सूर्य गोचर करणार आहे. ही वेळ खूपच शुभ असणार आहे. प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्थितीचा लाभ मिळेल.

कन्या : या राशीच्या नवव्या भावात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळू शकते. या काळात नवीन काहीतरी शिकता येईल.

मकर : या राशीच्या पाचव्या स्थानात सूर्यदेव असतील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. तसेच वैवाहिक जीवन चांगलं राहील. पण या काळात तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ संक्राती महत्त्व आणि स्नान दान पुण्यकाळ

सूर्यदेवांनी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करताच वृषभ संक्रांती असेल. म्हणजेच 15 मे रोजी वृषभ संक्रांती आहे. या काळात सूर्यदेवाची पूजा केल्यास कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो अशी मान्यता आहे. एकूण पुण्यकाळ 7 तास 3 मिनिटांसाठी आहे. पहाटे 4 वाजून 55 मिनिटे ते 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील.

वृषभ संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करा आणि पितरांना जल अर्पण करून तर्पण करा. तसेच दान करा. यामुळे पितृदोष दूर होतो. नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच स्नान करा.

स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि पूजा करा. सूर्यदेवांच्या मंत्रांचा जप करा. सूर्य चालिसा आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. त्यानंतर सूर्यदेवांची आरती करा. तसेच गुळ, गहू, तिळ, लाल कपडा, फळं यांचं दान करू शकता.

वृषभ संक्रांतीचं महत्त्व

वृषभ संक्रांतीला सूर्याची पूजा केल्याने कुंडलीतील सूर्यदोष दूर होतो. स्नानानंतर पितरांन जल तर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांसाठी दान केल्यास पुण्य आणि आशीर्वाद मिळतो. सूर्यदेवांशी निगडीत वस्तूंचं दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?