
मुंबई : आपली आर्थिक स्थिती बळकट राहावी अशी प्रत्त्येकाचीच इच्छा असते. यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत काeरतात. बऱ्याचदा मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा वेळी लक्ष्मी प्रसन्न नाही असं आपण म्हणतो. तर एखाद्याला कमी मेहनतीतही जास्त लाभ होतो अशा व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न असते. सनातन धर्मात माता लक्ष्मीला (Lakshmi Upay) संपत्तीची देवी म्हटले जाते. असे मानले जाते की ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकाचे धन सदैव भरलेले राहते. खरं तर, शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वीच एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात ज्यामुळे त्याचे भाग्य बदलू शकते. चला, ती शुभ संकेत कोणते आहेत ते जाणून घेऊया.
घरामध्ये सरडे दिसणे सामान्य आहे. परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला तीन सरडे एकत्र दिसले तर ते धनाच्या आगमनाचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की आपण लवकरच पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्त व्हाल.
रात्रीच्या वेळी तुमच्या घरात काळ्या मुंग्यां दिसल्या तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. अशा वेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी त्यांना साखर किंवा पीठ खायला द्यावे.
संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्याचे घरटे दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते. म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुमचे दिवस उजळेल.
जर तुम्हाला स्वप्नात बासरी, कमळाचे फूल, गुलाब किंवा झाडू यांसारख्या गोष्टी दिसायला लागल्या तर ते लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असू शकते. अशी स्वप्ने पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)