लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय आहेत प्रभावी, आर्थिक उत्पन्नात होते वाढ

माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही.

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय आहेत प्रभावी, आर्थिक उत्पन्नात होते वाढ
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:57 PM

मुंबई : शास्त्रानुसार माता लक्ष्मीला (Mata Lakshmi Puja) धन लक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करतो. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हे प्रभावी उपाय जाणून घ्या.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

या वस्तू लक्ष्मीला अर्पण करा

शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख, गाई, कमळाचे फूल, माखणा, बताशे, खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

साखरेचा उपाय

शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील.

हे सुद्धा वाचा

श्रीयंत्राची पूजा करावी

शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी. यासोबतच श्री सूक्ताचे पठण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल.

कमळाचे फूल अर्पण करा

कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे. कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीचा फोटो किंवा मुर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी. तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो नसावे.

सुखी वैवाहिक जीवनासाठी

वैवाहिक जीवनात काही वाद होत असतील तर शुक्रवारी बेडरूममध्ये लव्ह बर्ड्सचे चित्र लावावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.