Sun Transit in Rohini Nakshatra: सुर्याचा या नक्षत्रातील प्रवेश, या चार राशींचे भाग्य पालटणार
सुर्यदेव हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. या सुर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश होणार असल्याने २५ मे रोजी पासून चार राशींचे भाग्य पालटणार आहे.

Rohini Nakshatra Transit: ब्रह्मांडात ग्रहांचे भ्रमण सतत होत असते. ज्योतिष शास्रात त्याचे अनेक संकेत असतात. येत्या २५ मे रोजी गंगा दशहराच्या शुभ मुहूर्तावर ग्रहांचा राजा सुर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्राच्या मते सूर्य देव गंगा दशहरा रोजी चंद्राचा स्वामी असलेल्या रोहिणी नक्षत्रात दुपारी ३.४४ वाजता प्रवेश करणार आहे. या भ्रमणाने चार विशेष राशींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि पैशांची बरसात होणार आहे. तसेच मिथुन रास असलेल्या लोकांचा देखील फायदा होणार आहे.
ज्योतिष शास्रानुसार सूर्याचे हे महत्वाचे भ्रमण ८ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. सूर्य देव १५ दिवस रोहिणी नक्षत्रात राहणार आहेत. या दरम्यान गंगेत स्नान करणाऱ्यांना मोठे लाभ होणार आहेत. याशिवाय सूर्याच्या आशीवार्दाने अनेक काळ लटकलेल्या समस्या मार्गी लागणार आहेत. चला तर पाहूयात कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.
वृषभ रास
सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांची सपंत्ती अनेक पटींनी वाढू शकते. उत्पन्नाचे नवे सोर्स वाढण्यासोबत ऑफीसच्या सहकार्यांचे संपूर्ण योगदान मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्याचा हा योग्य काळ आहे. तुमच्या जुन्या गुंतवणूकीतून अचानक लाभ मिळेल.वडीलांच्या वारशाने संपत्तीचाल लाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या व्यक्तीत्वात सकारात्मक बदलांमुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल.
मिथुन रास
गंगा दशहराच्या आशीवार्दाने मिथुन राशीच्या लोकांना करियरमध्ये नवीन संधी मिळेल. जास्त काळ मेहनत केल्याचे गोड फळ मिळण्याचा काळ आला आहे. व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
सिंह रास
या नक्षत्राचे भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खरोखरच ‘स्वर्ण काळ’ घेऊन आला आहे. जे लोक पगार वाढीचा वा पदोन्नतीची वाट पाहात आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची जास्त शक्यता आहे. ज्योतिषशास्रानुसार या लोकांना आर्थिक चिंतेपासून मुक्त होऊन मोकळा श्वास घेण्याचा काळ आला आहे. व्यवसायात असलेले लोक नवा निर्णय घेऊ शकतात, ज्याचा भविष्यात लाभ होईल. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत निर्माण झाल्याने रोख रकमेत वाढ होईल. आता तणाव आणि मानसिक दबाव आता कायमचे दूर होतील.
धनु रास
धनु रास असलेल्या लोकांना त्यांचा अडकलेला पैसा मिळेल, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. योजनाबद्ध खर्च आणि बचतीमुळे तुमच्या बचतीत वाढ होईल. एखादा नवा प्रोजेक्ट किंवा नोकरीचा प्रस्ताव तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
( डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. येथे दिलेली माहिती आणि तथ्यांच्या अचूकते संदर्भात टीव्ही ९ मराठी वेबसाईट जबाबदार नाही. )