AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी 18 मार्च हा दिवस खास, अद्भुत संयोगात करा हे उपाय

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष असं महत्त्व आहे. न्यायदेवतेच्या भूमिकेत असले तरी त्यांची गणना पापग्रहात होते. त्यामुळे 18 मार्च 2023 हा दिवस खास असणार आहे.

शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी 18 मार्च हा दिवस खास, अद्भुत संयोगात करा हे उपाय
शनिदेवांना तेज प्राप्त होताच 18 मार्चपासून या राशींचं नशिब चमकणार, जातकांनी हे उपाय करून मिळवा फायदा
| Updated on: Mar 17, 2023 | 12:43 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशीबदल करत असतो. या दरम्यान काही ग्रह अस्त किंवा उदीत होतात. त्याप्रमाणे त्या ग्रहांचं फळ मिळतं. शनिदेव सध्या स्वराशीत असून उदीत झाल्यानंतर 18 मार्चपासून पूर्ण शक्तिसह कार्यरत होणार आहेत. त्यामुळे जातकांना हा दिवस खास असणार आहे. सध्या साडेसाती आणि अडीचकी सुरु असलेले जातक या दिवशी खास उपाय करून शनिदेवांच्या त्रासातून दिलास मिळवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत.

18 मार्च 2023 हा दिवस खास असणार आहे, कारण फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला श्रवण नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी स्वत: शनिदेव आहेत. त्याचबरोबर या दिवशी शिवयोग आहे. त्यामुळे शनिदेवांची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

शनिवारी एकादशी आल्याने भगवान विष्णुंची पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. शनिदेव भगवान विष्णुंच्या कृष्णाचे उपासक आहेत. त्यामुळे या दिवशी शनिदेवांसह भगवान विष्णुंची पूजा केल्यास शनि त्रासातून दिलासा मिळू शकतो.

शनिदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय

सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा.पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करून दिवा लावा. पिंपळाच्या वृक्षाचं पूजन केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. ओम शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करा. शनिवारी शनि चालीसा आणि शनि स्तोत्राचं पठण करा.

चार राशींना या योगाचा विशेष लाभ

मकर : शनिदेवांना तेज प्राप्त होणार असल्याने या राशीच्या जातकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. मानसिक तणावातून या काळात सुटका होईल. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. तुमचं काम लोखंड, पेट्रोलियम पदार्थांशी निगडीत असेल तर तुम्हाला त्यातून फायदा होईल. त्यामुळे पुढचे तीन महिने तुमच्यासाठी खास असतील.

कुंभ : या राशीतच शनिदेव आपलं तेज प्राप्त करणार आहेत. गोचर कुंडलीत शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. त्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. वैवाहिक जीवनातही आनंद प्राप्त होईल. कमिशन आणि कन्सल्टंसीचं काम करणाऱ्या या काळात चांगला आर्थिक लाभ होईल.

वृषभ : शनिदेव या राशीच्या गोचर कुंडलीत शश आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे. यामुळे वडिलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात पदोन्नतीचा योग आहे. पगारात मनासारखी वाढ दिसून येईल. विदेशात कामानिमित्त जाण्याचा योग जुळून येईल.

तूळ : या राशीची नुकतीच अडीचकीतून सुटका झाली आहे. गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. अध्यात्म, विचारक, रिसर्च, डॉक्टर, शास्त्रज्ञ असलेल्या जातकांना हा काळ चांगला जाईल. लॉटरी किंवा शेअर बाजारातून अचानक धनलाभ होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?