Vastu Tips : घरात कधीच ठेवू नका अशी फुलंं, हाताने मागे लावनू घेताल साडेसाती
बहुतेक घरांमध्ये पूजेमध्ये फुले वापरली जातात ती लवकर काढली जात नाहीत. पण जर ही फुले तुम्ही लवकर काढली नाही तर ते तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकतं. याबाबत बहुतेक लोकांना माहिती नसेल.

मुंबई : कोणतेही शुभकार्य असो कार्यक्रम असो अशावेळी फुलांचा वापर आवर्जून केला जातो. मग पूजेसाठी फुले लागतात, हार लागतो किंवा कार्यक्रमात सजावटीसाठी फुलांच्या माळांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात फुलांचा वापर आवर्जून केला जातो. त्यात बहुतेक लोकांना फुलं खूप आवडतात. त्यामुळे ते घरात एक फुलदाणी ठेवून दररोज वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवत असतात. घरात सुकलेल्या फुलांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुले ही लगेच घराबाहेर ठेवावीत. घरांमध्ये जर सुकलेली फुले ठेवली तर वाईट शक्तींचा प्रवेश निर्माण होतो, त्यामुळे घरात कधीही सुकलेली फुले ठेवू नये.
जर तुम्ही तुमच्या घरात सुकलेली फुले ठेवली तर ते अशुभ मानलं जातं. कारण सुकलेली फुले ही मृत शरीर शरीरासारखी असतात. ज्याप्रमाणे कोणताही मृतदेह घरामध्ये ठेवला जात नाही त्याप्रमाणे घरात सुकलेली फुले देखील ठेवू नये. जर तुम्हीही तुमच्या घरात पूजा झाल्यानंतर सुकलेली फुले तशीच ठेवत असाल तर ती लगेच काढा आणि घराबाहेर ठेवा.
सुप्रसिद्ध तंत्र ग्रंथ मंत्र महारणव मध्ये असं म्हटलं आहे की, आपण देवाला जी फुले अर्पण करतो ती फुले त्वरित शुद्ध होतात. तसंच निर्माल्य हे ताबडतोब काढून टाकावे. नाहीतर घरामध्ये नकारात्मक शक्ती उपभोग घेण्यास येतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे घरामध्ये सुकलेली फुले ठेवण्यावर बंदी केली जाते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरी कधीही पूजा केल्यानंतर सुकलेली फुले ठेवू नका.
प्रत्येकाने आपल्या घरात नेहमी ताजी फुले ठेवावीत. कारण घरात जर तुम्ही ताजी फुले ठेवली तर तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहते. तसेच ताजी फुले सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जिथे ही ताजी फुले असतात तिथे इतर सजीवांना त्यांच्या ऊर्जेने ते भरतात. त्यामुळे कधीही तुम्ही तुमच्या घरी पूजेसाठी किंवा फुलदाणीमध्ये नेहमी ताजी फुले ठेवा.
