Vastu Tips : घरात ठेवलेल्या या गोष्टी कायम ठरतात साडेसातीचं कारण, आताच द्या फेकून घराबाहेर!
वास्तुशास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. तर आता आपण आपल्या घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि व्यक्तीला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही.
मुंबई : प्रत्येकजण घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी खूप मेहनत, कष्ट घेताना दिसतो. आजकाल प्रत्येक व्यक्तीला पुरेसे पैसे हवे असतात. पैशांची कमतरता भासू नये यासाठी लोक पाहिजे ते काम करत असतात, भरपूर मेहनत घेतात, कष्ट करतात. पण काही लोकांना कितीही मेहनत करून देखील हवं तसं यश मिळत नाही. काही लोकांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही वाईट घटना, संकटं येताना दिसतात. तर वास्तू तज्ज्ञांच्या मते, आपल्या घरात असलेल्या काही नकारात्मक गोष्टींमुळे त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
जुनी वर्तमानपत्रे – कधीही आपल्या घरात जुनी वर्तमानपत्रे ठेवू नये. कारण घरात जुनी वर्तमानपत्र ठेवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदत नाही. नेहमी अनेक समस्या निर्माण होत असतात. तर तुमच्याही घरात जुनी वर्तमानपत्र पडून असतील तर लगेच ते भंगार विक्रेत्याला विकून टाका.
जुन्या वस्तू – बहुतेक लोकांच्या घरात काही अशा वस्तू असतात ज्यांचा वापर केला जात नाही. घरात जुन्या अशा वस्तू असतात ज्या फेकून न देता लोक त्यांच्या स्टोअर रूममध्ये ठेवतात. पण अशा वापरात नसलेल्या जुन्या वस्तू घरात ठेवणं चुकीचं ठरतं. अशा जुन्या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी कोपते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्याही घरात अशा जुन्या वस्तू असतील तर त्या आजच बाहेर टाकून द्या.
जुनी डायरी – काही लोकांच्या घरात वापरत नसलेली जुनी डायरी असते. पण वास्तुशास्त्रानुसार, जुन्या डायरीमुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या आयुष्यात प्रगती होत नाही. त्यामुळे अशी निरुपयोगी डायरी ताबडतोब बाहेर फेकून द्या किंवा रद्दीत देऊन टाका.
खराब कुलूप – जर तुमच्या घरात गंजलेले, खराब असे कुलूप असेल तर ते घरात ठेवू नका ते तातडीने बाहेर टाकून द्या. कारण घरात खराब कुलूप ठेवल्यामुळे त्या घरातील कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही. त्यामुळे असे खराब झालेले कुलूप एकतर दुरुस्त करा किंवा ते बाहेर टाकून द्या.
जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन – बहुतेक लोकांच्या घरात बिघडलेला मोबाईल, चार्जर किंवा बल असे इलेक्ट्रिक वस्तू असतात. पण अशा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशी जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरात कधीही ठेवू नका ती बाहेर टाकून द्या