AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : धन लाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी अवश्य करा वास्तूशास्त्रातले हे उपाय

वास्तू दोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळा, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद, तब्बेतीच्या कुरकुरी आणि पैशांसंबंधीच्या समस्या  यासोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो.

Vastu Tips : धन लाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी अवश्य करा वास्तूशास्त्रातले हे उपाय
वास्तू उपायImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 23, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई : अनेकवेळा कष्ट करूनही कष्टाचे फळ मिळत नाही. गरजा आणि महागाई वाढल्याने खर्च भागवणे कठीण होत आहे. बऱ्याचदा यासाठी घरातील वास्तू दोषही कारणीभूत असतो. वास्तू दोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळा, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद, तब्बेतीच्या कुरकुरी आणि पैशांसंबंधीच्या समस्या  यासोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो. अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय (Vastu Tips) सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने धन, जीवनात प्रगती, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. चला जाणून घेऊया वास्तुच्या या सोप्या उपायांबद्दल.

पैशाशी संबंधित गोष्टी या दिशेने ठेवा

आर्थिक सुबत्ता आणि स्थिरतेसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. या दिशेला तिजोरी, कपाट, सोने-चांदी, दागिने, आर्थिक कागदपत्रे इत्यादी वस्तू नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. ही दिशा पृथ्वीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते, जी स्थिरता सुनिश्चित करते. या दिशेने ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात. पैशाशी संबंधित गोष्टी कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका, याकडे दुर्लक्ष केल्याने आर्थिक हानी होते.

फिश पॉट या दिशेने ठेवा

घराच्या ईशान्य कोपऱ्यात फिश पॉट किंवा छोटा कारंजा ठेवणे खूप शुभ मानले जाते. ईशान्य दिशेला देवी-देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाची असते. या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये. पाण्याशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने नशिबाचे दार उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो. मात्र या ठिकाणी घाण पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. यासोबतच घरातील सर्व नळ योग्य असावेत, ते ठिबकत नसावेत.

ही दिशा स्वच्छ आणि रिकामी ठेवा

घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच स्वच्छ आणि रिकामी असावी. ज्ञानाअभावी बहुतेक घरांमध्ये सोफे, टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात, जे योग्य नाही. ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धन-समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच आरोग्यही प्राप्त होते.

स्वयंपाकघर या दिशेला असावे

घरातील अग्नि, आकाश, वायू, पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे. म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच आग्नेय कोनात असावे. तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. या ठिकाणी केशरी, लाल, गुलाबी रंग वापरावेत. तसेच, हे ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा. असे केल्याने धनाची वृद्धी होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?