AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मानसिक तणावापासून पाहिजे असेल मुक्ती तर, वास्तूशास्त्रातल्या या उपायांचे नक्की करा पालन

Vastu Tips वास्तू नियमांच्या दुर्लक्षामुळे माणसाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषांच्या मते पत्रिकेत चंद्र कमजोर असला तरीही मानसिक तणावाची समस्या असते.

Vastu Tips : मानसिक तणावापासून पाहिजे असेल मुक्ती तर, वास्तूशास्त्रातल्या या उपायांचे नक्की करा पालन
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2023 | 8:04 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात वास्तु उपायांना विशेष महत्त्व आहे. यासाठी घरबांधणीपासून प्रवेशापर्यंत वास्तू नियमांचे (Vastu Tips) पालन करण्याचा सल्ला दिला जातो.  वास्तू नियमांच्या दुर्लक्षामुळे माणसाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषांच्या मते पत्रिकेत चंद्र कमजोर असला तरीही मानसिक तणावाची समस्या असते. याशिवाय वास्तुदोष असतानाही व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही मानसिक तणावाच्या समस्येने त्रस्त असाल तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा.

मानसिक तणावावर वास्तु उपाय

वास्तू तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या खोलीत क्रोधी देवी-देवतांची चित्रे लावल्याने मानसिक तणावाची समस्याही निर्माण होते. तुमच्या खोलीत क्रोधी देवतांची चित्रे असतील तर ती काढून टाका. असे केल्याने मानसिक तणावाची समस्या दूर होईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घरामध्ये माता काली, भैरव देव आणि शनिदेव यांचे फोटो देखील लावू नये.

तुमच्या घरात तुटलेल्या वस्तू असतील तर लवकरात लवकर काढून टाका. तुटलेल्या वस्तू घरात ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात. वास्तू दोषांमुळे मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होतात. त्याच वेळी, कुटुंबातील सदस्यांमध्ये विसंवादाची परिस्थिती तयार होते.

मानसिक तणावातून मुक्ती मिळवायची असेल तर घरात बांबूचे रोप लावा. असे म्हटले जाते की बांबूचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर मन शांत राहते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढते.

वास्तु तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्याबरोबर आरशाकडे पाहू नये. असे केल्याने मन दिवसभर चंचल राहते. यासाठी सकाळी उठल्याबरोबर आरशाकडे पाहण्याच्या सवयीत बदल करा.

जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी एखादे भांडे पाण्याने भरून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांमध्ये टाका. हा उपाय रोज करा. असे केल्याने मानसिक तणावाची समस्या दूर होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.