Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 22 ते 28 मे 2023, या राशीच्या लोकांच्या मान सन्मानात होणार वाढ
साप्ताहिक राशी भविष्य. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा जाणार हा आठवडा

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, (Weekly rashi bhavishya Marathi) महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य
मेष
प्रत्येक दिवस हा चांगला जाणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज वाटणार नाही. या सप्ताहात अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त प्रगती होईल. गुरुपुष्यामृत योग स्वप्नवत गोष्टी पूर्ण करणारा आहे. व्यवसायात इतरांनी मार्गदर्शन करावे, ही अपेक्षा मनात न ठेवता काम केलेले चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी वेळीच सुधारल्या तर कामाला वेळ लागणार नाही. आर्थिक नियोजन चांगले असेल. राजकीय क्षेत्रात कामात व्यस्त राहाल. भावंडांच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य असतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. प्रकृतीत सुधारणा होईल.
वृषभ
ज्या वेळी परिस्थिती हाताबाहेर असते त्या वेळी नको तेवढा प्रयत्न करता व ती कामे यशस्वी झाली नाही की नाराजही होता. पण सध्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांगल्या कालावधीत नेहमी सकारात्मकता वाढत असते हे विसरू नका. तेव्हा ही सुवर्णसंधी आहे असे समजा. गुरुपुष्यामृत योग तुमच्या चतुर्थस्थानातून होत आहे हा योग नक्कीच तुमच्या बचतीत वाढ करेल. व्यावसायिकदृष्टय़ा तुम्ही स्वत:हूनच बदल करून कामाचा व्याप वाढवणार आहात. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कराल. ओळखीचा जेवढय़ास तेवढा वापर करा. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन
सप्ताहात शुभ ग्रहांची साथ चांगली आहे असेच म्हणावे लागेल. ज्या गोष्टींना बरेच दिवस उशीर लागत होता त्या गोष्टी वेळेत होतील. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेता येईल. चांगल्या कालावधीमध्ये इतरांकडून मार्गदर्शनही चांगलेच मिळेल. स्वत:च्या हिमतीवर कामात यश मिळेल. गुरुपुष्यामृत योग धनस्थानातून होत आहे. धनस्थान मजबूत होईल. व्यावसायिक उलाढाल वाढलेली असेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामांमध्ये ज्या गोष्टींविषयी शंकाकुशंका वाटत होत्या त्या शंकांचे निरसन होईल. आर्थिकदृष्टय़ा मजबुती येईल. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. भावंडांना वेळीच समज द्या. नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रकृती चांगली असेल.
कर्क
कोणाच्या सांगण्या- बोलण्याचा फारसा विचार करू नका. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्हालाच त्रास होऊ शकतो. स्पष्ट गोष्टी बोलल्यामुळे नात्यात अंतर येऊ शकते. शांत राहूनच काम करणे योग्य राहील. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. सध्या कोणाचे मत काय, या विषयावर चर्चा करू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. खर्च आटोक्यात ठेवा. समाजसेवेत गुंतून राहाल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
सिंह
चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे हे माहीतच आहे. त्यामुळे त्यासाठी धावपळ करायची नाही. जे जमणार आहे अशाच गोष्टींसाठी वेळ घालवलेला चांगला राहील. धीर धरूनच प्रत्येक गोष्ट करावी लागेल. गुरुपुष्यामृत योग तुमच्या व्ययस्थानातून होत आहे. या दिवशी फार मोठी खरेदी करू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्टय़ा जी सुरळीत घडी चाललेली आहे त्यात बदल होतील. त्यासाठी तुम्हालाच पर्यायी मार्ग शोधावे लागतील. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. धार्मिक गोष्टीत सहभाग नसला तरी खर्च कराल. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.
