AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्याच्या मृत्यूनंतर परिवारातील लोकं का करतात मुंडन, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

भारत हा असंख्य प्रथा आणि परंपरांचा देश आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आहे. काही धर्मांचे नियम हे अगदीच एकमेकांच्या विरुद्धसुद्धा आहे. हिंदूंमध्ये देखील अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत.

एखाद्याच्या मृत्यूनंतर परिवारातील लोकं का करतात मुंडन, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
मुंडनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 14, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात विधींना खूप महत्त्व दिले जाते. मुलाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती आयुष्यभर वेगवेगळे विधी करत असतात. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराबाबत काही नियम दिलेले आहेत. असे केल्याने आत्मा मुक्त होतो असे मानले जाते. हे नियम पाळले नाहीत तर मृत व्याक्तीच्या आत्माला त्रास होतो असेही माणले जाते. अंत्यविधीच्या वेळी मुंडण (Mundan) करण्याचा नियमही असाच आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

मृत व्याक्तीबद्दल सन्मान दर्शवतो

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्य त्याच्याबद्दल आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मुंडण करतात. केसांशिवाय सौंदर्य नाही असं म्हणतात.

हानिकारक जीवाणू टाळण्यासाठी

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचे शरीर सडण्यास सुरुवात होते. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. या दरम्यान कुटुंबातील सदस्य घरापासून स्मशानभूमीपर्यंत अनेक वेळा मृतदेहाला स्पर्श करतात, त्यामुळे ते त्या हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येतात. ते बॅक्टेरियाही केसांना चिकटून राहतात. आंघोळ केल्यावरही बॅक्टेरिया केसांमध्ये राहातात, त्यामुळे केस काढले जातात.

सुतक पूर्ण करण्यासाठी

हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवस कुटुंबात सुतक ज्याला आपण वृद्धी म्हणतो ते पाळले जाते. यावेळी कुटुंबातील सदस्यांना धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात सुतक असतो, या काळात धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. सुतक काळात मुंडन करण्याची प्रथा आहे.

मृत व्यक्तीशी संपर्क होऊ नये यासाठी

गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. यमराजाची भीक मागून तो यमलोकातून परत येते आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. शरीर नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी तो घरच्यांच्या केसांचा आधार घेते. अशी मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?