AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chankya niti : गप्प राहण्यातच शहाणपण… ‘या’ सिक्रेट गोष्टी बायकोला कधीच सांगू नका, नाही तर… चाणक्यांनी असा कोणता धोक्याचा इशारा दिलाय ?

मानवी जीवन सोपे आणि यशस्वी बनवण्यासंबंधी चाणक्य नीतीमध्ये या नीति ग्रंथामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात करिअर, मैत्री, वैवाहिक जीवन, संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chankya niti : गप्प राहण्यातच शहाणपण... 'या' सिक्रेट गोष्टी बायकोला कधीच सांगू नका, नाही तर... चाणक्यांनी असा कोणता धोक्याचा इशारा दिलाय ?
'या' सिक्रेट गोष्टी बायकोला कधीच सांगू नका,
| Updated on: Feb 07, 2025 | 3:31 PM
Share

मानवी जीवन सोपे आणि यशस्वी बनवण्यासंबंधी चाणक्य नीतीमध्ये या नीति ग्रंथामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात करिअर, मैत्री, वैवाहिक जीवन, संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. खरंतर आजही आचार्य चाणक्यांनी दिलेली धोरणे केवळ राज्यकारभारासाठीच नव्हे तर मानवी जीवनातही अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

चाणक्यांनी नीती शास्त्रामध्ये पैसा, प्रगती, विवाह, मैत्री, शत्रुत्व आणि व्यापार इत्यादी समस्यांवर उपाय सांगितले आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्री-पुरुष संबंध तसेच त्यांच्या गुणांचाही उल्लेख आहे. खरं तर, लग्न हे प्रत्येकासाठी खूप खास असते आणि आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यावी, जी त्यांना सर्व प्रकारे प्रेम देऊ शकेल आणि त्यांची काळजी घेऊ शकेल,असे प्रत्येकाला वाटत असतं. एक चांगला जीवनसाथी आयुष्यात आनंद आणू शकतो,असं म्हणतात .

पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात असे म्हणतात. दोघेही सुख-दुःखाचे सोबती असतात. पण तरीही आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या कुणाला सांगू नयेत. चाणक्य नीतिनुसार, या गोष्टी पतीने पत्नीपासून लपवून ठेवण्यातच शहाणपण असतं. अन्यथा पतीला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पुरुषांनी आपल्या पत्नीला कोणत्या गोष्टी सांगू नयेत, हे जाणून घेऊया

तुमची कमजोरी

आचार्य चाणक्य सांगतात, की जर तुमच्यात काही कमजोरी असेल,तुमची एखादी दुबळी बाजू असेल तर त्याची माहिती फक्त स्वतःकडे ठेवा. हे तुम्ही तुमच्या पत्नीलाही सांगू नका. जर तुमच्या पत्नीला तुमच्या कमकुवतपणाबद्दल समजले तर ती तुमच्या कमजोरीवर हल्ला करू शकते. प्रत्येक गोष्टीबद्दल बोलून दाखवेल, सुनावेल . त्यामुळे तुमची कमजोरी कोणाला सांगू नका.

अपमान

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात सांगतात, की पुरुषांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये. स्त्रिया पुन्हा पुन्हा त्याच अपमानाबद्दल टोमणे मारतात असे मानले जाते.

केलेलं दान

दानाचे मूल्य तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केले जाते. एका हाताने काही गोष्ट दिली असेल तर त्याबद्दल दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या दानाबद्दल तुमच्या पत्नीलाही सांगू नका. यामुळे तुमच्या देणगीचे महत्त्व तर कमी होतेच, पण कधी कधी तुमची पत्नी धर्मादायतेवर झालेल्या खर्चाचे कारण सांगून तुम्हाला बरं- वाईट सुनावू शकते.

कमाई

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या कमाईबद्दल पत्नीला कधीही सांगू नये. जर तिला तुमच्या कमाईची माहिती मिळाली तर ती त्यावर तिचा अधिकार सांगून तुमचे सर्व खर्च थांबवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे काही वेळा महत्त्वाच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...