केवळ ‘ओम’ नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व

| Updated on: Jan 04, 2022 | 7:10 AM

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

केवळ ओम नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व
Lord-Shiva
Follow us on

मुंबई : हिंदू धर्माची ओळख ‘ओम’ या शब्दाने होते. हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले लोक ‘ओम’चा उच्चार करतात. पुराणात ‘ओम’ जप करण्याचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत. वास्तविक, हिंदू धर्मात मंत्रांच्या जपाचे विशेष महत्त्व आहे आणि सर्व मंत्रांचा उच्चार ओमने सुरू होतो.  ओम हा शब्द नसून सर्व जग त्यात व्याप्त आहे.

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

ओम चे पौराणिक महत्त्व
सनातन धर्माच्या मान्यतेनुसार ओमच्या उच्चारात संपूर्ण विश्वाचे ज्ञान दडलेले आहे. केवळ ओमचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर करतात. ओमचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा आवाज मानवी श्रवणशक्तीपेक्षा खूप उच्च आहे. आकाशाच्या कवेत गेल्यानंतर ही हा आवाज येतो अशी मान्यता आहे. ‘ओम्’ उच्चारण करताना तोंडातून ‘म’ चा आवाज येतो तेव्हा ते आपल्या मेंदूला ऊर्जा देते आणि त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा विकास होतो.

‘ओम’चे फायदे

  • ओम नामच्या जपामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
  • यामुळे तुम्ही कोणताही तणावापासून मुक्तता मिळवू शकता, हा जप तुम्हाला चिंतामुक्त करतो.
  • यामुळे तुमच्या भावनांचा समतोल राखण्यास आणि तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत होते.
  • ओमचा जप केल्याने एखादया गोष्टीतला तुमचा फोकस सुधारतो.
  • तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता शक्ती सुधारते.
  • हा जप तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला अधिक आशावादी बनवते.
  • रागासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्यास मदत करते.

उच्चार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात ओमचा उच्चार करावा. ओमचा उच्चार केल्याने श्वास वेगवान होतो, अशा स्थितीत मोकळ्या जागेवर ओमचा उच्चार केल्याने सकारात्मकता प्राप्त होते. सुखासन, पद्मासन, वज्रासन इत्यादी ठिकाणी बसून ओमचा उच्चार करता येतो. याशिवाय ॐ 5,7,11 किंवा 21 वेळा उच्चारणे उपयुक्त मानले जातात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंंधित बातम्या : 

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!