AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | व्यक्तिमत्व कितीही मोठं असू दे, जर तुमच्यात हे अवगुण असतील तर सर्व निरर्थक…

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले सिद्धांत आणि त्यांच्या नीती इतक्या (Chanakya Niti) वर्षांनंतरही लोकांमध्ये प्रचलित आहे.

Chanakya Niti | व्यक्तिमत्व कितीही मोठं असू दे, जर  तुमच्यात हे अवगुण असतील तर सर्व निरर्थक...
Acharya-Chanakya
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 08, 2021 | 9:19 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले सिद्धांत आणि त्यांच्या नीती इतक्या (Chanakya Niti) वर्षांनंतरही लोकांमध्ये प्रचलित आहे. लोक आजही ते वाचतात आणि जीवनात त्यांचं अनुसरणही करतात. यामुळे आचार्य चाणक्य यांनी संपूर्ण जीवनात लोकांच्या कल्याणासाठीच काम केलं आहे. लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी अध्ययन केलं, जीवनाची बाजू त्यांनी तपासली. त्यानंतर आपल्या अनुभवांना चाणक्य नीती ग्रंथाच्या माध्यमातून सामान्य जनतेला योग्य जीवन जगण्याची प्रेरणा दिली. चाणक्य नीतीमधील अशाच काही गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवं (Acharya Chanakya Said No Matter How Big Your Personality Is If It Is Demerit Nothing Can Last Forever In Chanakya Niti)-

1. आचार्य चाणक्यच्या मते कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या सवयींवरुन होत असते. जर तुमच्या सवयी चांगल्या नसतील तर काहीच ठीक नसेल. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती अस्वच्छ वस्त्र परिधान करते, सूर्योदयानंतर झोपून उठते, दात व्यवस्थित स्वच्छ करत नाही आणि नेहमी कटू आणि वाईटवचन बोलतात, अशी व्यक्ती कितीही मोठी व्यक्तिमत्व असेल. तरी त्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहात नाही आणि कमावलेलं धन खूप काळापर्यंत त्याच्याजवळ टिकत नाही.

2. काटे आणि दुष्ट लोकांपासून वाचण्यासाठी चाणक्य यांनी दोन उपाय सांगितले आहेत. काट्यांपासून वाचायचं असेल तर पायत बूट घाला आणि दुष्टांपासून वाचायचं असेल तर त्यांचा इतना अपमान करा की ते परत तुमच्यापुढे डोकं वर करण्याची हिम्मत करणार नाहीत.

3. व्यक्ती कितीही कमकुवत असला, तरी त्याला त्याच्या कमजोरीबाबत कधीही दुसऱ्यांना सांगू नये. कारण, साप हा विषारी नसला तरी तो डसणे सोडत नाही.

4. जी संपत्ती कमावण्यासाठी इतरांची हाजीहाजी करावी लागेल, सदाचार सोडावा लागेल आणि अत्याचार सहन करावे लागतील अशी संपत्ती न घेतलेलीच बरी.

5. तुमच्या भूतकाळात जर तुमच्याकडून एखादी मोठी चूक झाली असेल तर हुई तो त्याचा वारंवार विचार करुन दु:खी होऊ नका. जे व्हायचं होतं ते झालं. आपल्या वर्तमान काळाला सांभाळा जेणेकरुन भविष्य अधिक चांगलं होईल.

6. तुम्ही कितीही मोठे ज्ञानी असाल, पण जर तुम्हाला तुमच्या आत्माचा बोध नसेल तर तुमचं जीवन त्या चमच्याप्रमाणे ज्याने अनोक पदार्थांना हलवलं आहे पण कधी त्याची चव घेतलेली नाही.

Acharya Chanakya Said No Matter How Big Your Personality Is If It Is Demerit Nothing Can Last Forever In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘या’ गोष्टींमध्ये पुरुषांपेक्षा महिलाच पुढे, लाजेमुळे नाही सांगत नाही…

Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ