AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल

माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला कधीच समाधान होत नाही (Acharya Chanakya). जितकं जास्त मिळेल तितक्या मोठ्या त्याच्या इच्छा होत जातात. तो दररोज अधिक मिळविण्याचा प्रयत्न करतो.

Chanakya Niti | माणसाने 'या' तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल
Acharya-Chanakya
| Updated on: Apr 30, 2021 | 12:33 PM
Share

मुंबई : माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला कधीच समाधान होत नाही (Acharya Chanakya). जितकं जास्त मिळेल तितक्या मोठ्या त्याच्या इच्छा होत जातात. तो दररोज अधिक मिळविण्याचा प्रयत्न करतो. पण आचार्य चाणक्य यांच्या मते काही गोष्टींमध्ये प्रत्येक व्यक्तीला समाधान करणे आलं पाहिजे. जर त्या गोष्टींमध्ये असंतोष कायम राहिला तर आयुष्य वेदनादायक होईल. त्याचबरोबर काही ठिकाणी असमाधानही आवश्यक आहे (Acharya Chanakya Said One Can Be Satisfied In These Three Things In Chanakya Niti).

चाणक्य नीतिच्या तेराव्या अध्यायातील 19 व्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की कुठल्या गोष्टींमध्ये आपण समाधानी असले पाहिजे आणि गोष्टींमध्ये समाधानी नसायला पाहिजे, चला जाणून घेऊया –

संतोषषस्त्रिषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने त्रिषु चैव न कर्तव्यो अध्ययने जपदानयोः

1. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार बायको आपल्या मनाप्रमाणे सुंदर नसली तरी तुम्ही समाधानी असले पाहिजे. काहीही झाले तरी लग्नानंतर माणसाने कधीही इतर स्त्रियांच्या मागे धावू नये, अन्यथा त्याचे आयुष्य उध्वस्त होते. एखाद्या व्यक्तीने पत्नीच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिचे गुण अधिक पाहिले पाहिजेत. सुशील पत्नी कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य आनंदी बनवू शकते.

2. याव्यतिरिक्त तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही आनंदाने देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारावे. जगात असे बरेच लोक आहेत ज्यांचे असे भाग्य नाही. म्हणून जेव्हा कोणत्याही प्रकारचे विचार मनात येतात तेव्हा त्या लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जे मिळाले आहे ते देवाच्या इच्छेने आहे. आनंदाने ते प्राप्त करण्यास शिका.

3. व्यक्तीकडे जेवढी संपत्ती आहेत त्यात त्याने समाधानी असले पाहिजे. जास्त पैशांच्या लालसेपोटी कोणतेही चुकीचे कार्य केले जाऊ नये किंवा आपण कोणाच्याही पैशांवर नजर टाकू नये. या सवयी आयुष्यात समस्या निर्माण करतात ज्यामुळे नंतर मोठे संकट आणि दु:खाचे रुप धारण करतात. म्हणूनच, आपल्या उत्पन्नावर समाधानी राहण्यास शिका आणि आपल्या उत्पन्नानुसार पैसे खर्च करा.

आता जाणून घेऊ की व्यक्तीने कुठल्या गोष्टीतस संतुष्ट राहू नये. चाणक्य यांच्यामते, अभ्यास, दान आणि जप यामध्ये कधीही समाधानी राहू नये कारण तुम्ही जितके जास्त कराल तितकेच तुम्हाला पुण्य आणि आदर मिळेल.

Acharya Chanakya Said One Can Be Satisfied In These Three Things In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या 8 प्रकारच्या लोकांना कुणाच्याही दु:खाने काहीही फरक पडत नाही, जाणून घ्या कोण आहेत ते…

Chanakya Niti | ‘हे’ लोक स्वतःच्याच विनाशाचे कारण बनतात

Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....