AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी कुठली ना कुठली समस्या असते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य इतके महान व्यक्ती होते की शतकांनंतरही लोक त्यांचे नाव आणि त्यांचे कथन मोठ्या आदराने स्मरण करतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आचार्यांनी आयुष्यभर केवळ लोकांच्या भल्यासाठी काम केले. तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आचार्य अनेक वर्षे येथे शिक्षक म्हणून राहिले आणि सर्व मुलांचे भविष्य त्यांनी उज्वल केले. तसेच अनेक रचना केल्या. त्यांच्यातील नीति शास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे.

Chanakya Niti | अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी कुठली ना कुठली समस्या असते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
CHANAKYA-NITI
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 8:07 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य इतके महान व्यक्ती होते की शतकांनंतरही लोक त्यांचे नाव आणि त्यांचे कथन मोठ्या आदराने स्मरण करतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आचार्यांनी आयुष्यभर केवळ लोकांच्या भल्यासाठी काम केले. तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आचार्य अनेक वर्षे येथे शिक्षक म्हणून राहिले आणि सर्व मुलांचे भविष्य त्यांनी उज्वल केले. तसेच अनेक रचना केल्या. त्यांच्यातील नीति शास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे.

नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचार्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीला धर्म आणि ज्ञानाच्या आधारावर योग्य आणि चुकीचा फरक करण्यास शिकवतात. जर एखाद्या व्यक्तीने आचार्यांचे शब्द समजून घेतले आणि ते आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला तर तो जीवनातील सर्व अडचणींवर सहज मात करु शकतो. पुस्तकाच्या सातव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात आचार्यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे जे आयुष्यात एक ना दुसऱ्या कारणाने त्रस्त राहतात कारण त्यांच्या आयुष्यातील समस्या संपण्याचे नाव घेत नाही.

नात्यन्तं सरलेन भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्, छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः

या श्लोकात आचार्यांनी मानवाची तुलना झाडांशी केली आहे आणि म्हटले आहे की ज्या लोकांचा स्वभाव अत्यंत साधा आहे त्यांनी हा स्वभाव बदलला पाहिजे कारण जा झाडे सरळ असतात तीच जंगलात प्रथम कापली जातात.

आचार्यांच्या या श्लोकात खूप खोल अर्थ दडलेला आहे. या श्लोकाद्वारे आचार्यांनी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे हे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही खूप सरळ, साधे आणि सहजगत्या जगणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागेल. हुशार लोक अशा लोकांचा पुरेपूर फायदा घेतात आणि त्यांच्यासाठी दररोज अडचणी निर्माण करतात.

बऱ्याच वेळा या लोकांना त्यांच्या कोणत्याही दोषामुळे त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्रास होतो. म्हणूनच एखादी व्यक्ती इतकी तीक्ष्ण आणि हुशार असली पाहिजे की तो अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करु शकेल. आपण आपले ध्येय साध्य करु शकता आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे हे 5 मंत्र लक्षात ठेवा, घरात धन-धान्याची कमतरता कधीही भासणार नाही

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.