Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी असण्याव्यतिरिक्त आचार्य चाणक्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्य चाणक्याचे खरे नाव विष्णुगुप्त होते. परंतु आचार्य श्री चणक यांचे शिष्य असल्याने त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान ज्ञानाचा उपयोग लोककल्याण, अखंड भारताची निर्मिती आणि इतर सृजनशील कामे करण्यासाठी केला, म्हणून त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते.

Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya_Chanakya

मुंबई : एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी असण्याव्यतिरिक्त आचार्य चाणक्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्य चाणक्याचे खरे नाव विष्णुगुप्त होते. परंतु आचार्य श्री चणक यांचे शिष्य असल्याने त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान ज्ञानाचा उपयोग लोककल्याण, अखंड भारताची निर्मिती आणि इतर सृजनशील कामे करण्यासाठी केला, म्हणून त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते.

त्यांनी अनेक रचना केल्या आहेत ज्या आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांच्या नीति शास्त्रात अशा अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत ज्याद्वारे लोकांना सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये मार्गदर्शन मिळते. आचार्यांनी पैशासंदर्भात सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

1. स्वाभिमान गमावून कमावलेला पैसा वाया जातो

आचार्य चाणक्य म्हणतात, एखाद्या व्यक्तीने कधीही आपला स्वाभिमान गमावू नये. कठोर अत्याचार सहन करुन, शोषित होऊन आणि स्वाभिमान गमावून मिळवलेली संपत्ती व्यर्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे पैसे कमवण्याच्या मागे लागून एखादी व्यक्ती आपला आदर गमावते. धनरहित आयुष्यापेक्षा आदर नसलेले जीवन अधिक कठीण असते. त्यामुळे अशा पैशांचा त्याग केला पाहिजे.

2. पैशांसाठी तत्त्वांशी तडजोड करणे महागात पडेल

आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने दोन पैशांची कमाईही कष्टाने केली पाहिजे. एखाद्याने पैशांचा लोभी नसावे किंवा त्याबद्दल कोणाचाही हेवा करु नये. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा. जे आपल्या तत्त्वांशी तडजोड करुन, चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन आणि सद्गुणांचा त्याग करुन पैसे कमवतात ते प्रत्यक्षात पैशांच्या स्वरुपात पाप कमावतात. एखाद्या व्यक्तीसाठी असे पैसे कमावणे खूप महागात पडू शकते. तसेच अशा लोकांना समाजात मान मिळत नाही.

3. चापलुसी करुन कमावलेल्या पैशांचा त्याग करणेच चांगले

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्याने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड करु नये. चापलुसी करणाऱ्यांच्या आयुष्यात काही मूल्य नसतात. अशा लोकांनी कितीही पैसा कमवला तरी, ते कधीच खरा आदर मिळवू शकत नाहीत. अशा पैशांचा त्याग करणेच चांगले.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | वाईट काळात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI