AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशी विवाहानंतर होणार लग्न सराईला सुरूवात, अशा आहेत तारखा

दिवाळी नंतर तुळशीचे लग्न लावल्या जाते देवउठनी एकादशीला जगाचे पालनहर्ता योग निद्रेतून जागे होतात. त्यानंतर लग्न कार्याला सुरूवात होते. देवउठनी एकादशीचा दिवस खूप महत्वाचा आहे, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी जागे होत असल्याने चातुर्मास संपतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठनी एकादशी म्हणतात.

तुळशी विवाहानंतर होणार लग्न सराईला सुरूवात, अशा आहेत तारखा
लग्नाचे मुहूर्तImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 29, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई : दिवाळी आली की लग्न सराईच्या तयारीला सुरूवात होते. लग्नाचा हॉल, बँडवाले, कॅटरींग आणि भडजी यांच्या तारखा ठरवण्यासाठी घरच्या मोठ्यांची लगबग सुरू होते. घरात चैतन्याच वातावरण असतं. यंदाची दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी नंतर तुळशीचे लग्न लावल्या जाते देवउठनी एकादशीला जगाचे पालनहर्ता योग निद्रेतून जागे होतात. त्यानंतर लग्न कार्याला सुरूवात होते. देवउठनी एकादशीचा दिवस खूप महत्वाचा आहे, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी जागे होत असल्याने चातुर्मास संपतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठनी एकादशी म्हणतात. यावर्षी देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबरला (Marraige Muhurat 2023) आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास आल्याने श्रावण 2 महिन्यांचा तर चातुर्मास 5 महिन्यांचा होता. त्यामुळे देवउठनी एकादशीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.

देवउठनी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, देवउठनी एकादशी तिथी 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:33 वाजता सुरू होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:31 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 23 नोव्हेंबरला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या तारखेपासून सर्व शुभ कार्ये सुरू होतील. देवशयनी एकादशीच्या तिथीपासून क्षीरसागरात निद्रावस्थेत गेलेले भगवान श्री हरी देवउठनी एकादशीपासून जागे होतात. यामुळे शुभ आणि शुभ कार्येही 4 महिने बंद राहतात. मग देवउठनी एकादशीपासूनच शुभकार्य सुरू होतात. हिंदू धर्मात देवूठाणी एकादशीला शुभ मुहूर्त मानले जाते. याचा अर्थ असा की या दिवशी शुभ मुहूर्त न पाळता सर्व शुभ आणि धार्मिक कार्य करता येतात. दुसऱ्याच दिवशी द्वादशी तिथीला भगवान विष्णू आणि तुळशीजींचा विवाह होतो. या दिवशी शालिग्राम रूप आणि तुळशीच्या रोपाचा विवाह केला जातो. घरामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात सुख-समृद्धी येते.

नोव्हेंबर 2023 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

जर तुम्ही नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा दिवस निश्चित करू शकता.

डिसेंबर 2023 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

2023 च्या शेवटच्या महिन्यात 4 डिसेंबर, 5 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या तारखा लग्नकार्यासाठी योग्य आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती