Jalgaon, अमळनेर: संत सखाराम महाराज यात्रेनिमित्त उजळले अमळनेर; बोरी नदीच्या पात्रात भरली यात्रा

Jalgaon, अमळनेर: संत सखाराम महाराज यात्रेनिमित्त उजळले अमळनेर; बोरी नदीच्या पात्रात भरली यात्रा

जळगाव येथील अमळनेर श्री संत सखाराम महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात भक्ती भावाने सुरवात झाली आहे.

अनिल केऱ्हाळे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 20, 2022 | 6:16 PM

प्रति पंढरपूर असलेल्या अमळनेरात (Amalner) बोरी नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा (Yatra) उत्साह वाढतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा बंद होती. मात्र, यंदा यात्रोत्सवात नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. यात्रेत पालखी सोहळा आटोपल्यावर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. खान्देशातील हा सर्वात शेवटचा यात्रोत्सव असल्याने भाविक आवर्जून लालजींच्या दर्शनाचा लाभ घेतात. यंदाही बोरी नदीचे पात्र खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळण्यांनी सजले आहेत.

भाविकांची प्रचंड गर्दी

दररोज भाविकांची प्रचंड गर्दी उसळत असून ज्यामुळे यात्रेतील व्यावसायिक व विक्रेते चांगलेच सुखावले आहेत.  दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. भाविकांची गर्दी असल्याने अक्षरशा दोन्ही पुलाकडे आपली वाहने पार्किंग करावी लागत आहेत.  तसेच मोठे पाळणे झुले मौत का कुवा हा स्पेशल शो यासह इतर शोसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे.  खाद्यपदार्थांची दुकाने कोल्ड्रिंक्स थंडपेय दुकाने व मीना बजार देखील हाउसफुल असून दररोजच्या  उपयोगी वस्तू खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी होत आहे.

 हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

श्री संत सखाराम महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात भक्ती भावाने सुरवात झाली आहे.  रथाची वाडी संस्थान मधुन ह.भ.प गादीपदी प्रसाद महाराज,आ.अनिल भाईदास पाटील, यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जागेवरून रथ हलविण्यात आला. युथ फाउंडेशन तर्फे रथावर फुलांचा वर्षाव करून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा प्रसंग यावेळी दृष्टीस पडला.

सर्वधर्मसमभावाची शिकवण

यात्रोत्सवात सर्वधर्मीय समाजबांधव परंपरेनुसार जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यात महाजन-माळी, पाटील, वाणी, शिंपी, धनगर, ब्राह्मण, बेलदार, नाभिक, भोई, बंगाली ब्राह्मण, मुस्लिम बांधव सहभागी होतात.

हे सुद्धा वाचा

धम्माल बच्चे कंपनीची

अनेकजण घरून डबे आणून नदीपात्रात सहकुटुंब न्याहारीचाआनंद घेत आहेत.  सोबत जिलेबी व भजी आणि चिवड्यावर देखील ताव मारत आहेत. विशेष करून सर्वाधिक धम्माल बच्चे कंपनीची असून पाळणे असो की इतर खेळणे प्रत्येक ठिकाणी बालकांची मौज मस्ती निदर्शनास येत आहे, काही बालके दररोज यात्रेत जाण्याचा आग्रह पालकांकडे धरीत असून पालक देखील मुलांचा हट्ट आनंदाने पुरवीत आहेत, रात्री उशिरापर्यंत यात्रोत्सवाची धामधूम सुरू राहत आहे, उत्तम नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त यामुळे यात्रोत्सव शांततेत या गर्दीमुळे साऱ्यांच व्यवसाईक पाळणे खेळण्यांची दुकानदारांचा उत्तम व्यवसाय होत असल्याने दोन वर्षांची कसर या यात्रेने काढल्याचे दिसू लागलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें