Anant Chaturdashi 2021: कृष्णानं पांडवांना अनंत चतुर्दशीचं व्रत ठेवायला का सांगितलं? वाचा , विधी, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व

त्याच जागेवर एक कलश स्थापित करा. त्याच कलशावर भगवान विष्णूची शेषनागवाला फोटो ठेवा. भगवान आणि अनंताला अक्षता, पुष्प, धूप-दीप अर्पित करुन देवाला खीर किंवा गोड पदार्थाचा भोग लावा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. सायंकाळी पुजा करुन व्रत सोडू शकता.

Anant Chaturdashi 2021: कृष्णानं पांडवांना अनंत चतुर्दशीचं व्रत ठेवायला का सांगितलं? वाचा , विधी, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
अनंत चतुर्थी यावेळेस रविवारी आहे, त्याचा मुहूर्त, विधी, व्रत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 4:36 PM

दरवर्षी भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणतात. अनंत चतुर्दशीलाच गणेशोत्सवाचा शेवटा होता. घरगुती गणपतीलाही याच दिवशी गणपत्ती बाप्पा मोरया, पुढचे वर्षी लवकर या म्हणत साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. ज्यादिवशी गणपतीचं विसर्जन होतं, त्याच दिवशी गणपतीची मोठी पुजाही केली जाते. कारण दिवस निरोपाचा असतो. खरं हे पावन पर्व हे श्रीहरीच्या पुजेचं आहे. यावर्षी अनंत चतुर्दशी ही रविवारी म्हणजेच 19 सप्टेंबरला आहे. त्यामुळेच सुट्टीचा दिवसही आहे आणि गणेशाचं विसर्जन.

अनंत चतुर्दशीलाच नारायणाच्या अनंत स्वरुपाची पुजा केली जाते. नारायणाची पुजा तसच व्रत ठेवलं तर सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. असं मानलं जातं की, अनंत चतुर्दशीला पुजा, व्रत केल्यामुळेच अक्षय्य पुण्य म्हणजेच कधीच न संपणारं पुण्य मिळतं. द्वापारयुगात जेव्हा पांडव जुगारात सर्व काही हरले होते आणि वनात भटकत होते त्यावेळेस त्यांना श्रीकृष्णानं अनंत चतुर्दशीचं व्रत ठेवायला सांगितलं होतं. त्यानंतरच पांडवांवरचे संकटाचे ढग कमी व्हायला लागले. त्यानंतरच कौरवांचा पराभव, शेवट करुन पांडवांनी स्वत:चे अधिकार परत मिळवले. आपण आता पाहुयात, अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त आणि व्रतविधी.

शुभ मुहूर्त यादिवशी चतुर्दशीची तिथी 19 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी सुरु होऊन, 20 सप्टेंबर सोमवारी सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहणार. पूजेसाठी सर्वोत्तम काळ, वेळ ही सकाळी 11 वाजून 56 मिनिट ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल. यादिवशी राहुकाळ सोडला तर कुठल्याही वेळेला पुजन केलं जाऊ शकतं. 19 सप्टेंबरला राहुकाळ हा सायंकाळी 4 वाजून 52 मिनिटांपासून ते 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील.

व्रत विधी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, व्रत ठेवण्याचा संकल्प करा. त्यानंतर पुजा करण्याची जी जागा आहे तिला स्वच्छ करा, तिथं गंगाजल किंवा पाणी शिंपडून ती जागा पवित्र करा. त्याच जागेवर एक कलश स्थापित करा. त्याच कलशावर भगवान विष्णूची शेषनागवाला फोटो ठेवा. भगवान आणि अनंताला अक्षता, पुष्प, धूप-दीप अर्पित करुन देवाला खीर किंवा गोड पदार्थाचा भोग लावा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. सायंकाळी पुजा करुन व्रत सोडू शकता.

(इथं दिलेली माहिती लोकभावना आणि परंपरांना लक्षात ठेऊन दिलेली आहे, त्यांचा कुठलाही वैज्ञानिक आधार नाही)

भन्नाट बुमराह चतुर आणि चलाख, ‘लिटिल मास्टर्स’कडून तोंडभरुन कौतुक, गावस्करांनी कारणही सांगितलं!

महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे नीती आयोगाकडून कौतूक, केंद्राने अधिक प्रोत्साहन द्यावे; आदित्य ठाकरेंची मागणी

अनिल परबांच्या दाव्याला भीक घालत नाही, आता सोमय्यांचं लक्ष्य काँग्रेस, एनसीपी!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.