Astro tips : घरातील देवघरात या 7 गोष्टी असल्यास होते धनलाभ
God Temple astrology : देवघरात कोणत्या गोष्टी असाव्यात ज्यामुळे लक्ष्मी माता वैभव आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देते. जाणून घ्या त्या सात गोष्टी कोणत्या आहेत ज्या घरातील मंदिरात असाव्यात.

Astrology Tips : घर ही एक अशी वास्तू आहे जीथे कुटुंब एकत्र असतं. पण या वास्तूमध्ये जर शांतता आणि वैभव हवं असेल तर अध्यातमात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. देवघर हे सुख, शांती आणि समृद्धीचे केंद्रबिंदू मानले जाते. अध्यात्मिक शांती मिळण्यासाठी आपण देवघरात ठेवलेल्या देवांसोबत बोलतो. देवाचा आशीर्वाद मागतो. याच देवघरात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या ठेवल्याने लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. ते आज जाणून घेउयात.
देवघरात असाव्या कोणत्या 7 गोष्टी
- कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. त्यामुळे घरात तर कुबेर यंत्र ठेवले तर यामुळे संपत्ती स्थिर होते. संपत्ती कमी होत नाही. याची दररोज पूजा करावी.
- घरातील देवघरात गणपतीची मूर्ती असणं खूप महत्त्वाचे असते. कारण गणपती हे लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत. गणेशाची पूजा करुन आपण लक्ष्मीचा वास मिळवू शकतात.
- शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामची पूजा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीसह शाळीग्रामची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
- लक्ष्मी मातेला पिवळ्या कौड्या आवडतात. पांढऱ्या कौड्यांना हळद लावून त्या देवघरात ठेवू शकतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
- देवघरात जर मोर पंख ठेवला तर घरातील नकारात्म उर्जा दूर होते. श्रीकृष्णाला मोराची पिसे प्रिय आहेत आणि ते भगवान विष्णूचा अवतार आहे.
- शंख देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो. पूजेत याचा वापर केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
- गंगा जल हे धार्मिक मान्यतांनुसार पवित्र मानले जाते. यामुळे घरातील गरिबी दूर होते. गंगाजलमुळे सर्व रोग आणि दोष मुक्त होते.
Non Stop LIVE Update