AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse 2026 : या तारखेला वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, कोणत्या राशींसाठी ठरणार अशुभ ?

2026 मधील शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला कर्क राशीत होईल. हे 'कंकणाकृती' स्वरूपात 'अग्नीचं कडं' म्हणून दिसेल, मात्र भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सुतक पाळले जाणार नाही.

Solar Eclipse 2026 : या तारखेला वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, कोणत्या राशींसाठी ठरणार अशुभ ?
सूर्यग्रहण 2026
| Updated on: Jun 12, 2026 | 12:56 PM
Share

August 2026 Solar Eclipse : हिंदू धर्माच सूर्य ग्रहण तसेच चंद्र ग्रहण हे देखील खूप अशुभ मानलं जातं. सूर्यग्रहण अमावस्येला, तर चंद्रग्रहण पौर्णिमेला लागतं. खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर या दोन्ही घटना अत्यंत कुतूहलजनक मानल्या जातात. या वर्षी श्रावण महिन्यात सूर्यग्रहण तसेच चंद्र ग्रहण अशी दोन्ही ग्रहणं लागणार आहेत. 2026 मधील दुसरं आणि या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण श्रावण महिन्यातील अमावस्येला (जी ‘हरियाली अमावस्या’ म्हणूनही ओळखली जाते) होणार आहे.

अवकाशात परिभ्रमण करताना जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो, तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून रोखला जातो. यालाच सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे बुधवार, 12 ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये होणार आहे. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, हे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असेल. आकाशात हे ग्रहण ‘अग्नीचं कडं’ (Ring of Fire) अशा स्वरूपात दिसेल. मात्र असं असलं तरीही हे ग्रहण भारतात दिसणार नाही; त्यामुळे देशात ‘सुतक’ पाळलं जाणार नाही. तरीही, या ग्रहणाचे विपरीत परिणाम मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींवर होऊ शकतात.

मेष रास – सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे मेष राशीच्या व्यक्तींचे अनावश्यक खर्च वाढू शकतात. या राशीच्या लोकांनी या काळात आपल्या वाणीवर संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे; अन्यथा, नातेसंबंधांवर ताण येऊ शकतो. तसेच, या काळात कोणतीही गुंतवणूक करणे टाळावे.

कर्क रास – हे सूर्यग्रहण कर्क राशीत होणार असल्याने, या राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

तूळ रास – या काळात, तूळ राशीच्या व्यक्तींना मुलांबाबत चिंता भेडसावू शकते. प्रेमसंबंधांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो; त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी.

मकर रास – या काळात, मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या भागीदारीत आणि वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

या राशीसांठी शुभ ठरेल सूर्यग्रहण

ज्योतिषांच्या सांगण्यानुसार, 2026 मधील ऑगस्ट महिन्यात होणारे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या काळात या राशींच्या व्यक्तींना करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात आणि त्यांच्या व्यवसायात अपेक्षेप्रमाणे प्रगती होऊ शकते. तसेच, त्यांची अडकलेली रक्कम परत मिळू शकते आणि त्यांना कार्यस्थळी उच्च दर्जा, प्रतिष्ठा व सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा