अंगावर पाल पडणं शुभ की अशुभ? मिळतात हे संकेत, शकून शास्त्र काय सांगतं?

पाल अंगावर पडणे शुभ असतं की अशुभ? पाल अंगावर पडण्याचे काय असतात संकेत? शकून शास्त्र काय सांगत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अंगावर पाल पडणं शुभ की अशुभ? मिळतात हे संकेत, शकून शास्त्र काय सांगतं?
| Updated on: Jun 26, 2025 | 2:26 PM

तुम्हालाही अनेकदा तुमच्या घरामध्ये पाल दिसत असेल, पाल कधी घराच्या भिंतीवर, तर कधी दरवाजावर अशी कुठेही असू शकते. पालीची शरीर रचनाच अशी असते की पालीला पाहाताच अनेक लोकं घाबरतात. अनेकदा असंही घडतं की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गप्पा मारत बसले आहात आणि अचानक पाल तुमच्या अंगावर पडते. अशा घटना अनेकदा घडतात. जेव्हा एखाद्याच्या अंगावर पाल पडते तेव्हा ती व्यक्ती लगेच अंघोळ करते, असंही पाहायला मिळतं, त्यामागे त्या व्यक्तीची अशी मान्यता असते की पाल अंगावर पडणं हे अशुभ असतं, जर आपण अंघोळ केली तर हा अशुभ योग दूर होईल.

मात्र दुसरीकडे शकुन शास्त्रामध्ये अंगावर पाल पडणं शुभ आणि अशुभ देखील मानलं गेलं आहे. हे त्या-त्या वेळेवर आणि स्थितीवर अवलंबून आहे. जर पाल तुमच्या उजव्या बाजुला पडली तर ते शुभ मानलं जातं, याचा अर्थ तुम्ही लवकरच तुमच्या एखाद्या मोठ्या शत्रुवर विजय मिळवणार आहात, असा त्याचा अर्थ होतो. तर दुसरीकडे जर समजा पाल तुमच्या कपाळावर भुवयांच्या मध्ये पडली तर हे अशुभ मानलं जातं. याचा अर्थ लवकरच तुमची मोठी धनहानी होऊ शकते. जर पाल तुमच्या खांद्यावर पडली तर ते देखील शुभ मानलं जात याचा अर्थ लवकर तुमच्या मान -सन्मानामध्ये मोठी वाढ होणार आहे, असे संकेत मिळतात. पाल गुडघ्यावर पडणं देखील शुभ मानलं जातं.

जर तुमच्या घरात पाल दिसली तर ते एक शुभ संकेत असतात. लवकरच तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो असं मानलं जातं. पाल अंगावर पडणं हे सामान्यत: अशुभ मानलं जातं. त्यामुळे लोक जर पाल अंगावर पडली तर लगेच अंघोळ करतात, कारण त्याच्या अशुभ परिणामांपासून आपला बचाव व्हावा अशी त्या मागची धारणा असते. मात्र शकुन शास्त्रामध्ये पाल अंगावर पडणं शुभ मानलं गेलं आहे. मात्र जेव्हा पाल तुमच्या अंगावर पडले ती स्थिती नेमकी कोणती आहे? कोणत्या वेळी तुमच्या अंगावर पाल पडते? शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडते? या गोष्टीवर अंगावर पडलेली पाल शुभ की अशुभ हे अवलंबून असतं