मोती घालताना या 3 चुका कधीही करू नका, अन्यथा वाढू शकतो मानसिक तणाव
मोती रत्न धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. पण मोती धारण करताना काही चुका करणे महागात पडू शकते. तसेच कोणत्याही ज्योतिष सल्ल्याशिवाय मोती धारण करू नये. मोतीची अंगठी घालताना काय नियम असतात आणि काय चुका टाळल्या पाहिजेत जाणून घेऊयात.

Avoid these 3 mistakes while wearing pearl stone ring, otherwise mental stress may increaseImage Credit source: tv9 marathi
रत्नशास्त्रात, मोती हे सर्वात खास आणि शक्तिशाली रत्न मानले जाते. इतर रत्नांप्रमाणे, मोती केवळ ज्योतिषाच्या सल्ल्यानेच घातला पाहिजे. कधीही मनाने मोती रत्न धारण करणे चुकीचे ठरू शकेल. मोतीचा थेट संबंध चंद्राशी असतो, म्हणून ते धारण केल्याने मन शांत होते असे मानले जाते. ज्यांना एकाग्रतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी मोती वरदान असते. ते राग देखील मोठ्या प्रमाणात शांत करते. मोती घालताना लोक काही सामान्य चुका करतात.त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी वाईट अनुभव येऊ लागतात. जर तुम्ही मोती घालण्याचा विचार करत असाल, किंवा तुम्हाला तुमच्या ज्योतिषाने सल्ला दिला असेल तर नक्कीच मोती घाला पण त्यावेळी काही चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
मोती घालताना या चुका कधीही करू नका
1. तुटलेला मोती किंवा एखादा क्रॅक गेलेला मोती देखील कधीही खरेदी करू नये. तो अंगठीत बसवण्यापूर्वी त्याची योग्य ती तपासणी करणे महत्वाचे आहे. अन्यथा परिणाम चुकीचे ठरू शकतात.
2. चांदीशिवाय इतर कोणत्याही धातूत मोती घालू नये. चांदीमध्ये मोती बसवल्याने त्याचे मूल्य वाढते आणि त्याचे फायदे दुप्पट होतात.
3. मोती नेहमी तुमच्या राशीनुसार घालावा. बरेच लोक छंद म्हणून ते घालणे पसंत करतात, परंतु हे योग्य नाही. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार आणि तुमच्या राशीनुसारच मोती धारण करावा, अन्यथा त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. यामुळे अनावश्यक मानसिक ताण वाढू शकतो.
4. प्रत्येक रत्नाप्रमाणे, मोत्यांचीही घालण्याची स्वतःची पद्धत आणि प्रक्रिया असते. योग्य विधींशिवाय मोती घातल्यास त्याचे पूर्ण फायदे, उत्तम फळ मिळू शकत नाहीत.
मोती घालण्याची योग्य पद्धत काय आहे?
वाढत्या चंद्राच्या वेळी सोमवारी मोती नेहमी घालावा. तो मोती उजव्या हाताच्या करंगळीत घालावेत. पौर्णिमेला मोती घालणे देखील शुभ मानले जाते. घालण्यापूर्वी, मोती गंगेच्या पाण्यात आणि कच्च्या दुधात थोडा वेळ बुडवून ठेवा. त्यानंतर मोतीला पाण्याने स्वच्छ करा आणि तेव्हाच तो धारण करावा. काहीजण रात्रभरही दुधात आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. पण लक्षात ठेवा सूर्योदयापूर्वी ती अंगठी घालणे आवश्यक आहे.. मोत्याची अंगठी घालताना चंद्र मंत्राचा 108 वेळा जप करायला विसरू नका.
या राशीच्या लोकांनी मोती कधीही घालू नये
मोती थेट चंद्राशी संबंधित असतो. रत्नशास्त्रानुसार, मकर, वृषभ, तूळ आणि कुंभ राशीखाली जन्मलेल्यांनी मोती घालणे टाळावे. खरं तर, या राशींचा स्वामी ग्रह चंद्राशी जुळत नाही. अशा परिस्थितीत, जर या राशीच्या लोकांनी मोती घातला तर त्यांना मानसिक समस्या येऊ शकतात. तसेच, जर राशीनुसार मोती घातला नाही तर व्यवसायात समस्या येऊ शकतात. मोती घालणाऱ्यांनी इतर रत्ने घालताना देखील काळजी घ्यावी.
मोती घालण्याचे फायदे
ज्योतिष आणि रत्नशास्त्रानुसार, मोती घालण्याचे अनेक फायदे आहेत. जर एखाद्याला आत्मविश्वासाची कमतरता असेल तर त्याने निश्चितच मोती घालावेत. मानसिक ताणतणाव किंवा वारंवार राग येण्याची समस्या असलेल्यांसाठी देखील मोती घालणे फायदेशीर आहे. झोपेच्या समस्या असलेल्यांनी देखील मोती घालण्याचा विचार करावा. पण ज्योतिषांच्या सल्ल्यानेच मोती धारण करावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
