AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशी विवाहादरम्यान ‘या’ चुका टाळा, काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जाणारा तुळशी विवाह हा एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या शुभ प्रसंगी तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा पुजेचे योग्य फळ मिळणार नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणत्या चुका टाळल्या पाहिजे.

तुळशी विवाहादरम्यान 'या' चुका टाळा, काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 02, 2025 | 4:19 PM
Share

कॅलेंडरनुसार 2 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून तुळशी विवाहाचा पवित्र सण सुरू झालेला आहे. पौर्णिमेच्यापर्यंत हा दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला येतो, जो देवुथनी एकादशी नंतरच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा आणि तुळशी मातेचा विवाह सोहळा पार पडतो. हा तुळशी विवाह आपल्या समाजात लग्न सोहळ्याला सुरूवात करण्याचे प्रतीक मानले जाते. तर या तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये थोडीशी चूक देखील अशुभ मानली जाते. तर या शुभ दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण तुळशी विवाहाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी, पूजेची पद्धत आणि काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात.

तुळशीच्या विवाहवेळी चुकूनही या चुका करू नका का ?

लक्ष्मी माता ही तुळशीमध्ये वास करते. या दिवशी तुळशीची पाने चुकून तोडली तर तो देवीचा अपमान मानला जातो. कारण आपल्या हिंदू धर्मात नैवेद्य दाखवण्यासाठी तुळशी पानं नैवेद्याच्या ताटात ठेवली जातात. तर यासाठी एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवा.

– आंघोळ न करता तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. यामुळे पूजेचे फायदे मिळत नाहीत.

– तुळशी विवाह हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्यासाठी या दिवसांमध्ये घरात तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळा.

– तुळशीजवळ शिवलिंग ठेऊ नका कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पौराणिक कथेनुसार, तुळशीचे मागील जन्म ‘वृंदा’ होते, जी असुर जालंधरची पत्नी होती. भगवान शिवाने जालंधराचा वध केल्यावर वृंदाने शिवाला शाप दिला की त्यांची पूजा तुळशीच्या पानांनी होणार नाही.

– तुळशी विवाहाच्या वेळी घरातील वातावरण शांत, श्रद्धाळू आणि आनंदी असले पाहिजे. भांडणे, वादविवाद किंवा मोठा आवाज लक्ष्मी-विष्णू यांचे आशीर्वाद मिळत नाही.

– तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि तुळशी मातेला गंगाजल किंवा पंचामृताने स्नान केल्याशिवाय विवाह सोहळा सुरू करू नये.

तुळशी विवाहाच्या वेळी काय करावे ?

संध्याकाळी, पूजास्थळ किंवा अंगण रांगोळी काढून सजवा. तुळशीच्या रोपावर उसाचा एक सुंदर मंडप तयार करा.

एका पाटावर पिवळ्या कापडात भगवान शालिग्राम आणि दुसऱ्या बाजूला तुळशीमातेची स्थापना करा.

तुळशी विवाह सोहळा फक्त संध्याकाळी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करा.

तुळशीमातेला लाल साडी आणि संपूर्ण श्रृंगार अर्पण करा. शालिग्राम यांना पिवळे कपडे आणि पवित्र धागा बांधा. तसेच शालिग्राम यांना चंदनाचा गंधक लावा आणि तुळशीमातेला कुंकू गंध लावा. त्यानंतर प्रथेप्रमाणे तुळशी विवाह सोहळ्याला सुरूवात करा.

तुळशी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर हात जोडून तुळशी माता आणि शालिग्राम यांच्या कडून क्षमा मागा आणि नकळत कोणतीही चूक झाली असेल तर क्षमा मागा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.