VIDEO | Ayodhya | 498 वर्षांनंतर अखेर तो खास दिवस आला, 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले रामलल्ला

रामजन्मभूमी संकुलातील तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेले रामलल्ला नागपंचमीच्या दिवशी 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले. हा झुला श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केला आहे. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, तब्बल 498 वर्षांच्या मंदिर विवादानंतर प्रथमच भगवान रामलल्ला चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले आहेत.

VIDEO | Ayodhya | 498 वर्षांनंतर अखेर तो खास दिवस आला, 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले रामलल्ला
Ayodhya Ramlala Silver Jhula

मुंबई : रामजन्मभूमी संकुलातील तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेले रामलल्ला नागपंचमीच्या दिवशी 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले. हा झुला श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केला आहे. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, तब्बल 498 वर्षांच्या मंदिर विवादानंतर प्रथमच भगवान रामलल्ला चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले आहेत. आता श्रावण झुला मेळाव्यादरम्यान श्रावण पौर्णिमेपर्यंत त्याचे दर्शन झुल्यावर विराजमान असलेल्या रुपातच होईल.

कजरी गीत गाऊन रामलल्लाला प्रसन्न केले

रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की न्यायालयाच्या आदेशावरुन मंदिर-मशिदीच्या वादाच्या वेळी रामलल्ला लाकडी झुल्यावर बसवून झुलनोत्सव साजरा केला जात होता. आता राम मंदिराच्या बाजुने सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राम मंदिर बांधले जात आहे. प्रत्येक कार्यक्रमात भव्यता आणली जात आहे. यादरम्यानच रामलल्ला चांदीच्या झुलामध्ये विराजमान झाले आहेत. कजरी गीत ऐकून त्यांना प्रसन्न करण्यात आले.

कोव्हिडमुळे झुलनोत्सव पुढे ढकलला

अयोध्येच्या प्रसिद्ध श्रावण झुला मेळ्यात कोव्हिड प्रोटोकॉलबाबत दक्षता घेतली जात आहे. संतांनी मणिपर्वताला होणारा झुलनोत्सव पुढे ढकलला. तेथे भाविकांची गर्दी जमू दिली जात नाहीये. गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने चेकिंग पॉईंट बनवले आहेत.

दरवर्षी श्रावण जत्रेत 10 लाखांपर्यंत गर्दी जमते. गेल्या वर्षी हा मेळा कोव्हिड संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आला होता, त्यामुळे यावर्षी कोविड प्रोटोकॉल अंतर्गत मंदिरांमध्ये मर्यादित संख्येने झुलनोत्सव चालू आहे.

संबंधित बातम्या : 

Photo : अयोध्येला भव्य दिव्य बनविण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट, फोटोमधून पाहा कशी असेल भविष्यातली रामनगरी!

अयोध्येत राम मंदिरासह ‘श्रीराम विद्यापीठा’चं काम सुरु, योगी सरकारचा निर्णय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI