अयोध्येत राम मंदिरासह ‘श्रीराम विद्यापीठा’चं काम सुरु, योगी सरकारचा निर्णय

अयोध्येत राम मंदिरासह 'श्रीराम विद्यापीठा'चं काम सुरु, योगी सरकारचा निर्णय
योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान म्हणत आधीच्या सरकारांवर टीका केलीय

अयोध्यात राम मंदिराच्या उभारणीसोबतच श्रीरामाच्या नावाने जोडले गेलेल्या प्रत्येक योजनेवर काम केलं जाणार आहे. त्यानुसार अयोध्येत श्रीरामाच्या नावाने उभारलं जाणाऱ्या विद्यापीठाचंही काम सुरु करण्यात आलं आहे.

सागर जोशी

|

Mar 08, 2021 | 11:20 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून अयोध्येच्या विकासाचं एक मॉडेल तयार करण्यात आलं आहे. अयोध्यात राम मंदिराच्या उभारणीसोबतच श्रीरामाच्या नावाने जोडले गेलेल्या प्रत्येक योजनेवर काम केलं जाणार आहे. त्यानुसार अयोध्येत श्रीरामाच्या नावाने उभारलं जाणाऱ्या विद्यापीठाचंही काम सुरु करण्यात आलं आहे.(UP government starts construction of Shri Ram University with Ram Temple in Ayodhya)

योगी सरकारद्वारे उभारण्यात येत अलेल्या श्रीराम विद्यापीठात रामाशी संबंधित सर्व संस्कृती, ग्रंथ आणि हिंदू धर्माबाबत अभ्यासक्रम शिकवला जाईल, तशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, योगी सरकारच्या या योजनेचं अयोध्येतील साधू-संतांनी स्वागत केलं आहे. या विद्यापीठाद्वारे श्रीरामाच्या जीवनातील आदर्श देशविदेशात जाणून घेण्यास मदत होईल, असं इथल्या साधू-संतांची म्हणणं आहे.

अयोध्येतील साधू-संतांकडून स्वागत

श्रीराम विद्यापीठ ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जगप्रसिद्ध शहरात शैक्षणिक व्यवस्था असणं गरजेचं आहे, असंराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास म्हणाले. तर ‘योगी सरकारचा हा निर्णय स्वागत योग्य आहे. अयोध्येत श्रीराम विद्यापीठाची स्थापना व्हावी अशी आम्ही सर्वांची इच्छा होती. या प्रकारे उच्च शिक्षण संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनावं यासाठी आम्ही अनेकदा राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं’, असं संत परमहंस यांनी म्हटलंय.

खासगी विद्यापीठांची मदत घेतली जाणार

अयोध्येत श्रीरामाच्या नावाने बन असलेल्या या विद्यापीठाचं काम प्राथमिक स्तरावर सुरु आहे. पुढील काळात खासगी विद्यापीठांच्या मदतीनं अयोध्येत एक मोठं विद्यापीठ उभारण्याचं काम केलं जाणार आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुगार भदौरिया यांनी योगी सरकारचं हे पाऊल म्हणजे निवडणुकीपूर्वी केला जाणारा व्यर्थ प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. समाजवादी पक्षानं सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

 संबंधित बातम्या :

Video : ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’, महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट, भाजप भिडणार?

राम मंदिराच्या उभारणीसाठी राज्यपाल कोश्यारींकडून 1,11,000, तर माजी खासदार रामशेठ ठाकूरांकडून 1 कोटींचा निधी

UP government starts construction of Shri Ram University with Ram Temple in Ayodhya

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें