
देवघरात पूजा असो किंवा आरती धूप-दिप आणि अगरबत्ती याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. पण त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कापूर. कापराशिवाय पूजा अपूर्णच वाटते. आणि कापूर हा फक्त पूजेसाठीच वापरला जातो असं नाही तर घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी देखील घरात जाळला जातो. फक्त त्याच्या पद्धती अनेक प्रकारच्या असतात. कोणी दारात कापूर जाळतं , कोणी कापराच्या पात्रात जाळून घरात फिरवतं किंवा काहीजण कापूर न जाळता फक्त आपल्या पाकिटात ठेवतात. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की कापूर जाळण्याची वेळ कोणती असते ते आणि मुख्य म्हणजे तो कोणत्या भांड्यात जाळणे सर्वात शुभ असते? चला जाणून घेऊयात.
कापूर जाळण्याचा योग्य नियम आणि वेळ कोणती
हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात देवाची नियमित पूजा मान्य आहे. पूजेदरम्यान अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. चंदन, अक्षता, कुंकू, गंगाजल आणि धूप अशा अनेक गोष्टी आहेत ज्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहते. कापूरचेही स्वतःचे असे महत्त्व आहे. पूजेव्यतिरिक्त, वास्तुशास्त्रात कापरलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की कापूर जाळल्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेली नकारात्मकता दूर होते. पण कापूर जाळण्याचा एक योग्य नियम आणि वेळ असते. तो कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळी जाळल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात तर चला जाणून घेऊयात त्याची योग्य पद्धत काय?
कापूर कधी जाळणे योग्य आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार, कापूर जाळण्याचा सर्वात शुभ मुहूर्त असतो तो म्हणजे ब्रह्म मुहूर्त. ब्रह्म मुहूर्तावर कापूर जाळल्याने अनेक फायदे होतात. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी कापूर जाळल्याने घरात सुख-समृद्धी येते असं म्हटलं जातं. मात्र सकाळच्या प्रार्थनेत किंवा पूजेत चुकूनही कधीही कापूर जाळला नाही पाहिजे. असे करणे योग्य मानले जात नाही. सकाळी तुम्ही अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा, धूप लावू शकता पण कापूर जाळणे टाळावे.
या भांड्यात कापूर जाळणे शुभ मानले जाते
कापूर जाळण्याचे काही नियम आहेत. जसे की ते कधीही ताटात किंवा उघड्यावर जाळू नये. तसेच, कापूर कधीही मातीच्या दिव्यात किंवा भांड्यात जाळू नये. कापूर जाळण्यासाठी सर्वोत्तम भांडे म्हणजे पितळ्याचे पात्र. यामुळे केलेली पूजा फळते असं म्हटलं जातं. आणि घरात सकारात्मक ऊर्जाही येते. योग्य दिशेला कापूर जाळल्याने अनेक फायदे होतात. कापूर जाळण्यासाठी सर्वोत्तम दिशा आग्नेय आहे. असे मानले जाते की या दिशेने कापूर जाळल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)