Buy a broom on Dussehra, you will receive the blessings of Goddess Lakshmi
Image Credit source: tv9 marathi
दसरा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी अनेक प्रकारे पूजा केली जाते. तसेच आख्यायिकेनुसार, भगवान रामाने या दिवशी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. शिवाय, देवी दुर्गेने दसऱ्याच्या दिवशी महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी, देवी दुर्गेची तसेच भगवान रामाची पूजा करतात.
दसऱ्याच्या दिवशी ही वस्तू खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
तसेच दसऱ्याच्या दिवशी अशी एक वस्तू जी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. ती वस्तू म्हणजे झाडू. दसऱ्यादिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याने अनेक सकारात्मक परिणाम आयुष्यात घडतात.
देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतो
धनत्रयोदशी व्यतिरिक्त, दसऱ्याला झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ते तुमच्या घरातील अशुद्धता, नकारात्मकता आणि गरिबी दूर करते, त्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती आणि समृद्धी येते. म्हणून, दसऱ्याला झाडू खरेदी करणे आवश्यक आहे.
दसऱ्याला ही वस्तू खरेदी का करावा?
दिवाळीची स्वच्छता दसऱ्यापासून सुरू होते. या दिवशी झाडू खरेदी करणे ही एक नवीन, शुभ सुरुवात असते. वास्तुशास्त्रानुसार, झाडू घरातील वास्तुदोष दूर करतो, ज्यामुळे आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळते असे म्हटले जाते.
दसऱ्याला घरात झाडू आणल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांपासून ते सर्वत्र नवीन संधी निर्माण होताना दिसते. घरातून नकारात्मकता दूर होते आणि आनंद तसेच शांती नांदते.
दसऱ्याच्या वेळी काय उपाय करावे?
दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून प्रार्थना करा. त्यानंतर बाजारातून गवत किंवा बांबूपासून बनवलेला झाडू आणा. घरी आणताना तो लाल कापडात किंवा लाल पिशवीत आणावा ते आणखी शुभ मानले जाते. त्यानंतर, एकादशीला झाडू वापरायला काढला तरी चालेल. त्याचा वापर सुरू करा. तो तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)