AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaitra Navratri : ही आहेत माता दुर्गेचे नऊ रूपे, कोणत्या दिवशी कोणत्या देवीची करावी आराधना?

चैत्र नवरात्री दरम्यान, माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते, त्यांना नवदुर्गा म्हणून ओळखले जाते.

Chaitra Navratri : ही आहेत माता दुर्गेचे नऊ रूपे, कोणत्या दिवशी कोणत्या देवीची करावी आराधना?
माता दुर्गेचे नऊ रूपं
| Updated on: Mar 16, 2023 | 10:51 AM
Share

मुंबई : चैत्र नवरात्रीची (Chaitra Navratri 2023) सुरुवात बुधवार, 22 मार्च रोजी कलशाच्या स्थापनेने होणार आहे. यावेळी चैत्र नवरात्र पूर्ण नऊ दिवसांचे असून 10 व्या दिवशी नवरात्रीचे व्रत साजरे केले जाणार आहे. चैत्र नवरात्री दरम्यान, माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते, त्यांना नवदुर्गा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी एक दिवस माता दुर्गेच्या विशेष रूपाला समर्पित आहे. जाणून घेऊया देवीचे नऊ अवतार कोणते आहेत आणि नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या अवताराची पूजा केली जाते?

असूरांचा नाश करण्यासाठी माता दुर्गा अवतरली

धार्मिक मान्यतेनुसार या संपूर्ण सृष्टीचा आधार भगवान शिव आणि माता आदिशक्ती आहेत. जेव्हा जगात दानवांचा आणि असुरांचा अत्याचार वाढला आणि सर्वत्र अधर्माचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा सर्व देवतांनी आदिशक्तीला आवाहन केले. मग माता दुर्गा प्रकट झाली आणि सर्व देवी-देवतांनी तिला आपली शस्त्रे आणि शक्ती दिली. पर्वतराज हिमालयाने तीला सिंह वाहन दिले.

माता दुर्गेचे नऊ अवतार

चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हा माता दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी पहिला अवतार आहे. देवी पार्वतीला शैलपुत्री म्हणतात कारण तिचे वडील पर्वतराज हिमालय होते. यानंतर नवदुर्गेमध्ये माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री आहे.

चैत्र नवरात्री 2023: कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल?

  1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. 22 मार्च हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे.
  2. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. 23 मार्च हा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे.
  3. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. 24 मार्च हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे.
  4. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. 25 मार्च हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे.
  5. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. 26 मार्च हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे.
  6. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते. 27 मार्च हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे.
  7. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते. 28 मार्च हा नवरात्रीचा सातवा दिवस आहे.
  8. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. २९ मार्च हा नवरात्रीचा आठवा दिवस आहे. तिला महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणतात.
  9. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. 31 मार्च हा नवरात्रीचा नववा दिवस आहे. याला महानवमी किंवा दुर्गा नवमी म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.