.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चैत्र पौर्णिमा ‘या’ 5 राशींसाठी ठरेल भाग्यवान, वाढेल वैवाहिक सुख आणि समृद्धी

चैत्र पौर्णिमा पाच राशींसाठी शुभ आहे. या पाच राशींच्या लोकांना कामात यश मिळेल आणि नवीन व्यवसायाचे प्रस्ताव येतील. आनंद, संपत्ती आणि समृद्धी वाढेल. चला जाणून घेऊया चैत्र पौर्णिमा 2026 साठी भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

चैत्र पौर्णिमा 'या' 5 राशींसाठी ठरेल भाग्यवान,  वाढेल वैवाहिक सुख आणि समृद्धी
चैत्र पौर्णिमा
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 1:09 PM
Share

वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 गुरुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने आशीर्वाद मिळतो. चंद्रदेवाच्या आशीर्वादाने सुख आणि शांती लाभते. या वर्षीची चैत्र पौर्णिमा पाच राशींसाठी शुभ आहे. या पाच राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखी होईल आणि त्यांच्या धनात व समृद्धीत वाढ होईल. चला तर मग आजच्या लेखात आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशी भाग्यवान आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

चैत्र पौर्णिमा या राशींसाठी आहे शुभ

मेष रास: चैत्र पौर्णिमा मेष राशींच्या लोकांसाठी एक शुभ दिवस आहे. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. या दिवशी या राशींच्या लोकांना एक नवीन संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या नोकरीसोबतच एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. तुमचे मनोधैर्य वाढेल आणि तुम्हाला मनःशांती मिळेल.

कन्या रास: चैत्र पौर्णिमेला कन्या राशीचे लोकं काहीतरी नवीन कार्य करण्यास सुरूवात करू शकतात. त्यांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. त्यांच्या कामातील यशामुळे आनंद मिळेल. या दिवशी कन्या राशींच्या लोकांचा लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो, जो तुम्ही स्वीकारू शकता. तसेच राजकारणात प्रवेश करण्याचा कल निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला त्यात पदही मिळू शकते. तुमच्या व्यावसायिक कल्पना उपयुक्त ठरतील आणि इतरांना त्यात रस वाटू शकतो.

तूळ: चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्तींना मानसिकदृष्ट्या सशक्त वाटेल. या दिवशी परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तूळ राशीचे लोकं या दिवशी घरे, दुकाने, जमीन इत्यादींची खरेदी-विक्री करून नफा मिळवू शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या दर्जात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. ते आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक राहा.

वृश्चिक: चैत्र पौर्णिमेला वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्णत्वास येऊ शकतात. कामात अडकलेल्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. तसेच या लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. हा दिवस सुखद अनुभव घेऊन येईल. तुमची अशा व्यक्तीशी भेट होऊ शकते जी खूप मदत करेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आनंदी राहील.

कुंभ: चैत्र पौर्णिमेला कुंभ राशीच्या व्यक्तींच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. तुम्हाला दैवी आशीर्वाद मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. नवविवाहित जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. इतरांवर विश्वास ठेवणे टाळा; आपली कामे गोपनीय ठेवल्यास यश मिळेल. तुमचे नातेसंबंध गोड राहतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर