AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा
farmerImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 7:58 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीच्या विषयात अटी व निकष यावर चर्चा झाली. प्राथमिक अंदादानुसार ५६ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अटी; निकष यात बदल होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपसमिती याबाबत निर्णय घेईल. मुख्यमंत्री मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. उद्या 30 जून आहे, 30 जून ला कर्जमाफी दिली जाईल, असं म्हटलं होतं. मात्र राज्यपालांची सही होऊन 5 जूलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांना नव्या अ‍ॅपच्या  माध्यमातून खतं उपलब्ध करुन दिले गेले आहेत. अ‍ॅपमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या देखील सोडवल्या जातील. एचटीबीटी कापसासाठी केंद्राकडून अद्याप परवानगी  मिळालेली नाहीये.  राज्यात 1119 खतविक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहे, राज्यात खत आणि बी बियाणांचा कोणताही तुटवडा नाहीये. सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढले जातील, केंद्र सरकारच्या आणि इतर योजनांकरता फार्मर आयडी गरजेचा आहे.  गावोगावी शिबीरे घेऊन हे फार्मर आयडी काढले जाणार आहेत. तालुका स्तरावर कृषीभवनाची मागणी केली आहे, याबाबत तातडीनं कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

अवकाळी पावसाची नुकसान भरपाई 

दरम्यान यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या, या अवकाळी पावसांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. अवकाळी पावसाचा 17 जिल्ह्यांना फटका बसला आहे, बाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरू असून, नुकसान भरपाई दिली जाईल असंही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा