
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्या काळात चाणक्य यांनी जे विचार या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते आजच्या युगातही तर्कसंगत वाटतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. कधी-कधी परिस्थिती अशी येते, की माणूस पूर्णपणे खचून जातो. तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो, आता आयुष्यात सगळं संपलं आहे, असं त्याला वाटू लागतं, त्याच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागतात, त्याला पुढचा कोणताच मार्ग दिसत नाही, अशा अवस्थेत काय करावं? हे चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
संकटांचा सिंहाप्रमाणे सामना करा – चाणक्य म्हणतात तुमच्यावर कितीही मोठी संकट असू द्या, घाबरून जाऊ नका, त्या संकटाचा सामना हा सिंहाप्रमाणे करा. ज्याप्रमाणे सिंह शिकार करण्यापूर्वी दोन पाऊलं मागे जातो, तसंच आपल्याही आयुष्यात घडलं आहे, असं समजा आणि त्यानंतर अशी झेप घ्या की तुम्हाला यश हे मिळालंच पाहिजे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नका.
संयम – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ज्या गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे संयम, चाणक्य म्हणतात तुमच्या पडत्या काळात तुम्ही संयम ठेवा, मात्र प्रयत्न करणं कधीही सोडू नका, एक दिवस हाच संयम तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे.
वेळ निघून जाते – एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ कधीही बसून राहत नाही, वाईट वेळ कधी न कधी निघून जाणार आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा आत्मविश्वासानं कामाला लागा, जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)