AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : आयुष्यात डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा? चाणक्य म्हणतात…

चाणक्य हे एक जगप्रसिद्ध कुटीनी तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपला खरा मित्र कोण? आणि कोणावर विश्वास ठेवल्यामुळे आपला विश्वासघात होऊ शकतो? हे सांगण्यासाठी त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये काही नीती सांगितल्या आहेत. त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

Chanakya Neeti : आयुष्यात डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा? चाणक्य म्हणतात...
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 6:52 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजही काळाच्या सुसंगत वाटतात. आयुष्य जगत असताना या नीती माणसाला मार्गदर्शन करतात. अनेकदा आपल्याला आयुष्यात असा प्रश्न पडतो की आपला खरा मित्र कोण आणि कोणी फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्याशी मैत्री केली आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकर न मिळाल्यास आपला मोठा विश्वासघात देखील होऊ शकतो. कारण आपण अनेकदा जो व्यक्ती आपल्यासोबत मैत्रीचं नाटक करत आहे, अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे आपल्याला आपला खरा मित्र कोण आणि कोण मैत्रीचं नाटक करतं? यातील फरक समजू शकतो.

मित्राची ओळख संकट काळात – चाणक्य म्हणतात तुमचा खरा मित्र कोण हे तुम्हाला फक्त तेव्हाच कळू शकतं जेव्हा तुम्ही संकटात असता. तुम्ही संकटामध्ये सापडल्यानंतर अनेक जण तुम्हाला सोडून जातील, पण जो खरा मित्र आहे, तो कधीही तुमची साथ सोडणार नाही. जो संकट काळात तुमच्यासोबत आहे, तोच तुमचा खरा मित्र आहे. अशा व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता.

वाईट गोष्टी – चाणक्य म्हणतात तुमचा जो खरा मित्र आहे, तो वाईट गोष्टींमध्ये तुमची कधीच साथ देणार नाही, भलेही त्यात त्याला कितीही फायदा दिसत असेल तरी देखील तो अशा गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, प्रसंगी त्यासाठी तो तुमच्याशी भांडण देखील करू शकतो.

टीका – चाणक्य म्हणतात तुमचा जो खरा मित्र असतो, त्याला नेहमी तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत असतं, त्यामुळे तुम्ही कुठे चुकत असाल तिथे तो तुमची खोटी स्तुती कधीच करणार नाही, तो तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी स्पष्टपणे तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देईल, अशा व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.