Chanakya Niti: तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर आधी तुमच्या ‘या’ सवयी बदला
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने चांगल्या सवयी शिकाव्यात असे वाटते कारण एखाद्या व्यक्तीच्या सवयी त्याचे व्यक्तिमत्व ठरवतात. पण चाणक्य जी म्हणतात की चांगल्या संस्कारांसाठी, पालकांनी देखील त्यांच्या वागण्यावर आणि सवयींवर लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम मुलावर होतो.

आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले नीती शास्त्र आजही अतिशय समर्पक आणि लोकप्रिय आहे. चाणक्य नीती शास्त्राचे जे कोणी अवलंबन करत त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडला आहे. चाणक्य जी सांगतात की मुलांचे भविष्य देखील त्यांचे पालक ज्या पद्धतीने त्यांचे पालनपोषण करतात त्यावर अवलंबून असते. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालकांनी त्यांच्या वागणुकीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात आचार्य चाणक्य नीती यांच्या नुसार मुलांना चांगले संस्कार देताना पालकांनी कोणत्या सवयी बदल्या पाहिजे.
ही गोष्ट करू नका
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार पालकांनी त्यांच्या मुलांसमोर राग आणि अहंकार यांसारख्या भावना दूर ठेवाव्यात. कारण तुम्हाला पाहून तुमची मुलंही तेच शिकतात, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनू शकतात.
लहान मुलांवर होतो थेट परिणाम
पालकांच्या वागण्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांवरही होतो, त्यामुळे इतर कोणाचाही अपमान त्यांच्या समोर करू नये किंवा मुलांसमोर भांडू नये, कारण याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर आणि मेंदूवर होतो, जो त्यांच्यासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे पालकांनी ही सवय लवकरात लवकर सुधारली पाहिजे असे आचार्य चाणक्य यांचे मत आहे.
तुमची ही सवय सुधारा
आचार्य चाणक्य पालकांना सल्ला देतात की त्यांनी मुलांसमोर वारंवार खोटे बोलू नये. कारण मुलं याच गोष्टी लक्षात ठेवतात, आणि त्यांना सुद्धा खोटं बोलण्याची सवय लागते. खोटं बोलण्याच्या सवयीमुळे भविष्यात त्यांच्यासाठी काही गोष्टी घातक ठरू शकतात. त्यामुळे पालकांनी ही सवय लवकरात लवकर सुधारा.
या गोष्टी लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य पालकांना सांगतात की त्यांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, त्या म्हणजे पालकांनी त्याच्या मुलांसमोर कोणत्याच गोष्टीचा दिखावा करू नये. कारण मुलं मोठी होताना ते जे बघतात त्या गोष्टींची सवय बनते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या मुलांनी चांगले संस्कार घडवायचे असतील तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
