
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. अनेकदा आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, अशी लोक स्वभावाने खूप धूर्त असतात, ते आपला विश्वासघात कधी करतात, ते आपल्याला कळत देखील नाही. अशा लोकांपासून कायम सावध राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात माणसं ओळखता आली पाहिजेत, चाणक्य यांनी अशा काही सवयी सांगितल्या आहेत, यातील एखादी जरी सवय समोरच्या व्यक्तीमध्ये दिसली तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
खोटं बोलण्याची सवयी- चाणक्य म्हणतात ज्या लोकांना वेळोवेळी खोटं बोलण्याची सवय असते, अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, असे लोक तुमचा विश्वासघात करू शकतात. अशा लोकांमुळे तुमचं भविष्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे ज्या लोकांना नेहमी खोटं बोलण्याची सवय असते अशा लोकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
अति प्रशांसा करणं – चाणक्य म्हणतता जर एखाद्या व्यक्तीने अचानक तुमची अति प्रशांसा करण्यास सुरुवात केली तर अशा व्यक्तीपासून सावध रहा. कारण जेव्हा एखादा व्यक्ती तुमची अति प्रशांसा करतो, तेव्हा त्यामागे त्याचा काहीतरी स्वार्थ लपलेला असतो, अशा व्यक्तीमुळे तुम्ही भविष्यात अडचणीत येऊ शकता. असे लोक नेहमी तुम्हाला चुकीचे सल्ले देतात.
अफवा – चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्याबद्दल खोटी माहिती पसरवतात, किंवा तुमचं नुकसान होईल या उद्देशानं काही अफवा पसरवण्याचं काम करतात अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. हे लोक खूप धोकादायक असतता, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)