Jalgaon Municipal Elections: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात भव्य प्रचार रॅली काढत पालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. पुढील पाच वर्षांत विकसित जळगाव करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त करत महापौर महायुतीचाच होईल असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये भव्य प्रचार रॅली काढून जळगाव पालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा प्रचार केला. शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे निवडणुका लढवत आहेत, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासह ही महायुती 75 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. फडणवीस यांनी पुढच्या पाच वर्षांत विकसित जळगाव करण्याचे आणि जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू न देण्याचे आश्वासन दिले. जळगाव पालिकेची जबाबदारी शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला असून, महायुतीचेच सरकार स्थापन होईल आणि महापौर महायुतीचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

